Advertisement

घरगुती सिलेंडर महागला, आता मोजावे लागतील 'इतके' पैसे

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. याआधी १ मे रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल केला नव्हता.

घरगुती सिलेंडर महागला, आता मोजावे लागतील 'इतके' पैसे
SHARES

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.  दिवसाआड पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले जात आहेत. तर आता सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder) किंमती वाढवल्या (price hiked) आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा मोटा फटका बसला आहे. 

१४ किलोच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात २५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता घरगुती अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ८३४ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. याआधी १ मे रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल केला नव्हता. तर एप्रिल महिन्यात १० रुपयांनी दर कमी केले होते. तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे दर वाढले होते. 

या वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत एकूण १४० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत १४.२ किलोच्या सिलेंडरसाठी ८०९ ऐवजी ८३४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईतही हाच भाव आहे. 



हेही वाचा -

दिलासादायक! घरोघरी लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार

माहुलमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा