आठवडी बाजार नावापुरते, शेतकरी मात्र हवालदील

धारावी - शेतकऱ्यांना फायदा व्हावा या हेतूने मुंबई शहरात ठिकठिकाणी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येते. धारावीमध्ये पहिल्यांदाच आठवडी बाजार भरविण्यात आला. पण या आठवडी बाजाराचे तीन तेरा झाल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांनी आठवडी बाजारात विक्रीसाठी ठेवायला आणलेल्या अनेक भाज्या यावेळी तशाच खरेदीविना पडून राहिल्याचं चित्र पहायला मिळालं.

Loading Comments