Advertisement

रघुराम राजन बँक आॅफ इंग्लंडचे गव्हर्नर?

राजन 'बीओई'चे कार्यरत गव्हर्नर मार्क कारने यांची जागा घेण्याचे संकेत ब्रिटनचे अर्थमंत्री फिलिप हेमंड यांनी दिले आहेत. मात्र अजून अधिकृतरित्या गव्हर्नर निवडीची प्रक्रिया सुरू झाली नसून संभाव्य उमेदवारांच्या नावांवर विचार सुरू असल्याचं त्यांनी तेथील प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं आहे.

रघुराम राजन बँक आॅफ इंग्लंडचे गव्हर्नर?
SHARES

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन 'बँक आॅफ इंग्लड'चे पुढील गव्हर्नर बनतील, अशी जोरदार चर्चा सध्या जागतिक पातळीवर रंगली आहे. राजन 'बीओई'चे कार्यरत गव्हर्नर मार्क कारने यांची जागा घेण्याचे संकेत ब्रिटनचे अर्थमंत्री फिलिप हेमंड यांनी दिले आहेत. मात्र अजून अधिकृतरित्या गव्हर्नर निवडीची प्रक्रिया सुरू झाली नसून संभाव्य उमेदवारांच्या नावांवर विचार सुरू असल्याचं त्यांनी तेथील प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं आहे.


सर्वात प्रभावशाली

मार्क कारने यांचा कार्यकाल जून २०१९ मध्ये संपत अाहे. कारने ब्रिटनच्या केंद्रीय बँकेच्या तीन सदस्यांच्या इतिहासातील पहिलेच गव्हर्नर आहेत. राजन 'आरबीआय'चे २३ वे गव्हर्नर होते. टाइम मॅगझिनने २०१६ मध्ये जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला होता.


कुणाच्या नावाची चर्चा?

आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि युनिव्हर्सिटी आॅफ शिकागोचे प्रोफेसर रघुराम राजन यांच्यासोबत मॅक्सिकन सेंट्रल बँकेचे माजी प्रमुख आॅगस्टीन कार्सटेन्स यांचं नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहे.


राजन यांची कारकिर्द

आरबीआयचे गव्हर्नर म्हणून ४ सप्टेंबर २०१६ मध्ये तीन वर्षांचा कार्यकाल संपल्यावर राजन पुन्हा शिकागो युनिव्हर्सिटीत रुजू झाले. पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यावर राजन यांनी या निर्णयाची जाहीर टीका केली होती. २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'आय डू व्हाॅट आय डू' या पुस्तकाने बेस्ट सेलरच्या यादीत स्थान मिळवलं होतं.



हेही वाचा-

महागाई वाढू नये म्हणून व्याजदर स्थिर

क्रिप्टोकरन्सीच्या खरेदीवर आरबीआयची बंदी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा