सिलिंडरवरही मिळणार 5 रुपयाची सूट!

 Pali Hill
सिलिंडरवरही मिळणार 5 रुपयाची सूट!

मुंबई - पेट्रोल-डिझेलपाठोपाठच आता घरगुती सिलिंडर (एलपीजी) खरेदीचे ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रत्येक सिलिंडरवर 5 रुपये सूट मिळणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्यातर्फे ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

कॅशलेस व्यवहारांना प्राेत्साहन देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. ग्राहकांनी सिलिंडरचे ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर मोबाईल, कम्प्युटरवर सवलतीची रक्कम दिसेल. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ग्राहक पेमेंट करू शकतात. पेट्रोल पंपांवर कॅशलेस पेट्रोल-डिझेल भरल्यास ग्राहकांना ०.७५ टक्के सूट याआधीच जाहीर करण्यात अाली अाहे.

Loading Comments