SHARE

मुंबई - खरीदी-विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं कॅशलेस योजना आणली होती. त्याचप्रमाणे आता कॅशबॅक योजना पेट्रोल आणि डिझेलवर सोमवार मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलीय. जर तुम्ही सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर कार्ड किंवा इतर कॅशलेस सुविधेतून पेट्रोल किंवा डिझेल विकत घेत असाल तर 0.75 पैशांची सूट मिळणार आहे. अर्थात शंभर रुपयामागे 0.75 पैसे तुम्हाला मिळतील. डेबिट कार्डने बिल भरणा केल्यास ते पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होतील. क्रेडिट कार्डने बिल भरल्यास प्रती शंभरमागे 0.75 पैसे परत मिळतील.

संबंधित विषय
ताज्या बातम्या