Advertisement

सोनं घसरलं, दर आले ४० हजारांच्या खाली


सोनं घसरलं, दर आले ४० हजारांच्या खाली
SHARES

गुढीपाडवा आणि लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठीही खुशखबर आहे. आता सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणावर खाली आले आहेत. सोने आता प्रतितोळा  ४० हजार रुपयांच्या खाली आलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजार मागील काही दिवसांपासून कोसळत आहे. याचबरोबर कच्चे तेलही स्वस्त होत आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया कमकुवत झाला आहे. परिणामी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील 10 दिवसात  सोनं प्रतितोळा सुमारे पाच हजारांनी स्वस्त होऊन ४० हजारांच्या खाली पोहोचलं आहे. मंगळवारी सोन्याचा दर १९४९ रुपयांनी घसरण होऊन प्रति दहा ग्रॅम ३९ हजार ६६१ रुपये झाला आहे. तर चांदीचा  भाव प्रतिकिलो ६४४५ रुपयांनी घसरला आहे. चांदी प्रतिकिलो ४० हजार ३०४ रुपये झाली आहे.

कोरोनामुळे सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून सराफा बाजारात शुकशुकाट आहे. मात्र तरीही ग्राहकांनी बाजारात पाठ फिरवल्याचंच चित्र आहे. दुसरीकडे चांदीचा दर प्रति किलो 6445 रुपयांनी घसरला. दिल्लीत सोमवारी सदिल्लीत सोन्याच्या दरात 455 रुपयांनी वाढ होऊन 41,610 रुपये प्रतितोळा झालं होतं. तर चांदी मात्र 1,283 रुपयांनी घसरुन 40 हजार 304 रुपये किलोंवर पोहोचली होती. शुक्रवारी  सोन्याचा दर प्रतितोळा 42 हजार 017 रुपयांवर बंद झाला होता. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा