गोल्ड बाॅन्ड योजनेला थंड प्रतिसाद

 Mumbai
गोल्ड बाॅन्ड योजनेला थंड प्रतिसाद
गोल्ड बाॅन्ड योजनेला थंड प्रतिसाद
See all

मुंबई - देशभर 26 ऑक्टोबरपासून गोल्ड बाॅन्ड योजना सुरु करण्यात आली आहे. तसंच दिवाळीत सोनं खरेदीकडे लोकांचा कल असूनही वित्त विभागाच्या गोल्ड बाॅन्ड योजनेला मुंबईसह राज्यात कमी प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यभरात फक्त 150 अर्ज फक्त भरण्यात आले आहेत. राज्यातील पोस्टाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी हे बाॅन्ड उपलब्ध करण्यात आले असले, तरी या योजनेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गोल्ड बाॅन्डच्या योजनेचे आर्थिक वर्षात एक ग्रॅमपासून ते 500 ग्रॅमपर्यत बाॅन्ड खरेदी करता येतात. एक ग्रॅम सोन्यासाठी 2,957 रुपयांच्या किंमतीचा बाॅन्ड आहे . त्यावर वर्षाला 2.5 टक्के दराने व्याज मिळणार आहे. या बाॅन्डसाठी किमान कालावधी पाच वर्षाचा आहे. गोल्ड बाॅन्डचा किमान कालावधी उलटल्यानंतर त्यावेळा असणाऱ्या सोन्याच्या दरानुसार पैसे मिळतील हा या बाॅन्डचा सर्वात मोठा फायदा आहे.

Loading Comments