Advertisement

देशाच्या इतिहासात सोनं प्रथमच ४३ हजारांच्या वर

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. आता तर सोनं (gold) विक्रमी भावावर पोहोचलं आहे.

देशाच्या इतिहासात सोनं प्रथमच ४३ हजारांच्या वर
SHARES

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. आता तर सोनं  (gold) विक्रमी भावावर पोहोचलं आहे. देशाच्या इतिहासात सोनं प्रथमच ४३ हजार रुपयांच्या वर गेलं आहे. गुरूवारी दिल्लीतील सराफा बाजारात  २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४३,१७० रूपयांवर पोहचला. भावात ७०० रुपयांची वाढ झाल्याने सोने विक्रमी दरावर पोहोचलं. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किंमती आणि लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढली आहे. सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबई (mumbai) सह देशातील अनेक प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात ४५० रुपयांनी वाढ झाली. तर चांदीचा भावही किलोमागे ५०० ते १,००० रुपयांनी वधारला आहे. गुरूवारी चांदीचा दर प्रतिकिलो ४८,६०० रूपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रूपयांची किंमत घसरल्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

सोन्याच्या भावात मागील आठ दिवसांत जवळपास १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचा भावांतही वाढ झाली आहे. लग्नसराईमुळे पुढील काही दिवसांत सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचा भावांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.


हेही वाचा -

कोरोनामुळे भारतीय बाजारपेठ आजारी, टिव्ही, फ्रिज आणि मोबाईल महागणार

१ एप्रिलपासून होणार BS-6 पेट्रोल-डिझेलची विक्री




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा