Advertisement

लाॅकडाऊनमुळे सोने आयातीत 30 वर्षातील सर्वात मोठी घट

एप्रिलमध्ये देशातील साेन्याच्या आयातीमध्ये ९९.९ % घट झाली आहे. एप्रिलमध्ये जवळपास सोन्याची आयात झालीच नाही.

लाॅकडाऊनमुळे सोने आयातीत 30 वर्षातील सर्वात मोठी घट
SHARES

एप्रिलमध्ये देशातील साेन्याच्या आयातीमध्ये ९९.९ % घट झाली आहे. एप्रिलमध्ये जवळपास सोन्याची आयात झालीच नाही.  गेल्या ३० वर्षांत साेन्याच्या आयातीत इतकी मोठी घट हाेण्याची ही पहिलीच वेळ आहे. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी देशात लाॅकडाऊन आहे. यामुळे विमान प्रवास ठप्प झालेला असून दागिन्यांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे आयातीत मोठी घसरण झाली आहे.  

भारतात साेन्याची आयात ही प्रामुख्याने हवाई मार्गाने हाेते. मात्र, लाॅकडाऊनमुळे विमान सेवा बंद आहे.  साेन्याचा वापर हाेणारा भारत हा चीननंतरचा दुसरा सर्वात माेठा देश आहे. परंतु, एप्रिल २०२० मध्ये देशात केवळ ५० किलाे साेने आयात हाेऊ शकले. गेल्या वर्षी याच महिन्यात ११०.१८ टन साेने आयात झाली हाेती. एप्रिलमध्ये साेने आयात घटून २८.४ लाख डॉलरवर आली आहे. गेल्या वर्षात याच महिन्यात ३९७ काेटी डाॅलरच्या साेन्याची देशात आयात झाली हाेती. दागिने उद्याेगाची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात दर वर्षी ८०० - ९०० टन साेन्याची आयात हाेते. 

वित्त वर्ष २०१९-२० मध्ये देशात साेन्याची आयात १४.२३ टक्के घसरून २,८२० काेटी डाॅलर झाली. वर्ष २०१८-१९ मध्ये ती ३ टक्क्यांनी कमी हाेऊन ३.२९१ काेटी डाॅलरवर आली. साेन्याची आयात घटल्यास देशाची व्यापार तूट कमी हाेण्यास मदत मिळते. नुकत्याच संपलेल्या २०१९-२० आर्थिक वर्षात व्यापार तूट १६.९१%नी कमी हाेऊन १५,२८८ काेटी डॉलरवर आली. त्या आधीच्या २०१८-१९मध्ये ती १८,४०० काेटी डाॅलर हाेती. जुलै-सप्टेंबमध्ये चालू खात्यातील तूट जीडीपीच्या तुलनेत ०.९ टक्के (६३० कोटी डॉलर) समान राहिली. २०१८ मध्ये याच कालावधीत ती जीडीपीच्या तुलनेत २.९ टक्के(१,९०० काेटी डाॅलर) हाेती.



हेही वाचा -

घरबसल्या स्वस्त सोने खरेदी करण्याची दुसरी संधी, 11 मेपासून योजना सुरू

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली

संतापजनक...! धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शिपायाला सोसायटीने प्रवेश नाकारला




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा