Advertisement

घरबसल्या स्वस्त सोने खरेदी करण्याची दुसरी संधी, 11 मेपासून योजना सुरू

सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदीसाठीचा दुसरा टप्पा 11 मेपासून सुरू होणार आहे.

घरबसल्या स्वस्त सोने खरेदी करण्याची दुसरी संधी, 11 मेपासून योजना सुरू
SHARES

सॉव्हरेन गोल्ड बाँड खरेदीसाठीचा दुसरा टप्पा 11 मेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे घरबसल्या स्वस्त सोन खरेदीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे.  20 एप्रिल ते 2 सप्टेंबरपर्यंत एकूण सहा टप्प्यांमध्ये सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी करण्यात येणार आहेत.

20 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान गोल्ड बाँड खरेदी करण्याचा पहिला टप्पा पार पडला. आता 11 मे ते 15 मेपर्यंत असणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वस्त सोनेखरेदी करता येणार आहे.  याकरता प्रति ग्रॅम सोन्याची किंमत 4,590 रुपये ठरवण्यात आली आहे. म्हणजे या योजनेतून प्रति तोळा 45900 किंमतीने सोने मिळेल. त्याचप्रमाणे ऑनलाइन पेमेंट केल्यास प्रत्येक बाँडमधील प्रति ग्रॅम सोन्यावर 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे ऑनलाइन अर्ज करून सोने खरेदी केल्यास प्रति ग्रॅम 4,540  रुपयांनी सोने खरेदी करता येईल

या योजनेअंतर्गत कमीत कमी 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येऊ शकेल. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. सॉव्हरेन गोल्ड बाँडची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गेल्या 3 दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या देण्यात आलेल्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.



हेही वाचा -

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली

संतापजनक...! धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शिपायाला सोसायटीने प्रवेश नाकारला




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा