Advertisement

सुवर्णसंधी! सोन्याच्या भावात १ हजारांची घट, लवकर करा सोनं खरेदी...

२ दिवसांपूर्वी मुंबईतील सोन्याचे दर दीड हजारांनी घटले होते, तर बुधवारी सोन्याच्या प्रति तोळा दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. असं असलं, तरी सोनं १ हजार रुपये स्वस्त झाला आहे. ही घट तात्पुरती असून पुढचे काही दिवस सोन्याचे दर कमीच राहतील. त्यामुळं ग्राहकांनी शक्यत तितक्या लवकर सोने खरेदी करावी, असा सल्ला सोने विक्रेते देत आहेत.

सुवर्णसंधी! सोन्याच्या भावात १ हजारांची घट, लवकर करा सोनं खरेदी...
SHARES

३२ हजारांच्या घरांत गेलेले सोन्याचे दर बुधवारी प्रति तोळा १ हजारांनी घसरले आहेत. बऱ्याच दिवसांनंतर सोन्याच्या दरात इतकी मोठी घट झाल्यानं सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी खूशखबर आहे. ही घट तात्पुरती असली, तरी ग्राहक या संधीचा लाभ उठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्याची माहिती वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर आशिष पेठे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

२ दिवसांपूर्वी मुंबईतील सोन्याचे दर दीड हजारांनी घटले होते, तर बुधवारी सोन्याच्या प्रति तोळा दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. असं असलं, तरी सोनं १ हजार रुपये स्वस्त झाला आहे. ही घट तात्पुरती असून पुढचे काही दिवस सोन्याचे दर कमीच राहतील. त्यामुळं ग्राहकांनी शक्यत तितक्या लवकर सोने खरेदी करावी, असा सल्लाही पेठे यांनी दिला.


प्रति तोळा किती दर?

दिवाळीत सोनेखरेदीला मोठी मागणी असते. पण एेन दिवाळीत सोन्याचे दर गगनाला भिडले होते. सोन्याच्या दरांनी ३२ हजारांचा आकडा पार केला होता. त्यामुळं इच्छा असूनही अनेकांना सोने खरेदी करता आली नव्हती. मात्र आता सोने खरेदीची सुवर्णसंधी ग्राहकांसाठी चालून आली आहे.

सोमवारी सोन्याच्या दरात दीड हजार रुपयांनी घट झाल्याने सोन्याचे दर प्रति तोळा ३१ हजार ३०० रुपयांपर्यंत आले होते. तर बुधवारी रात्री सोन्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाल्याने मुंबईत बुधवारी प्रति तोळा ३०,९०० असे सोन्याचे दर पाहायला मिळत आहेत.


कारण काय?

सोन्याच्या मागणीत झालेली घट, डाॅलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण यामुळे सोन्याचे दरही घसरले आहेत. सोन्याचे दर कमी झाल्यानं गेल्या २ दिवसांत सोने खरेदीसाठी ग्राहकांची संख्या वाढत असल्याचंही आशिष पेठे यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा-

मुद्दल देईल, पण व्याज देणार नाही, विजय मल्ल्याची कर्ज फेडण्याची तयारी

एसबीअायच्या 'या' ग्राहकांना करता येणार मोफत एटीएम व्यवहार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा