Advertisement

एसबीअायच्या 'या' ग्राहकांना करता येणार मोफत एटीएम व्यवहार

सध्या एसबीअायच्या ग्राहकांना मोठ्या शहरांमध्ये महिन्याला एटीएममधून ८ मोफत व्यवहार करता येतात. यामधील ५ व्यवहार एसबीअायचे एटीएम अाणि ३ व्यवहार दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून करता येतात.

एसबीअायच्या 'या' ग्राहकांना करता येणार मोफत एटीएम व्यवहार
SHARES

स्टेट बँक अाॅफ इंडिया (एसबीअाय) च्या खातेधारकांसाठी अाता अानंदाची बातमी अाहे. एसबीअायच्या ग्राहकांना एटीएममधून अमर्यादित व्यवहार मोफत करता येणार अाहेत. मात्र, यासाठी खातेधारकांना कमीत कमी शिल्लक रक्कम खात्यात ठेवण्याचा नियम पाळावा लागणार अाहे. सध्या खातेधारकांना एटीएममधून एका महिन्यात फक्त ८ ते १० व्यवहार मोफत करता येतात. 


८ मोफत व्यवहार

सध्या एसबीअायच्या ग्राहकांना मोठ्या शहरांमध्ये महिन्याला एटीएममधून ८ मोफत व्यवहार करता येतात. यामधील ५ व्यवहार एसबीअायचे एटीएम अाणि ३ व्यवहार दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून करता येतात. लहान शहरांमध्ये मोफत व्यवहारांची मर्यादा १० अाहे. मोफत व्यवहारांव्यतिरिक्त प्रत्येक व्यवहाराला ५ ते २० रुपये (जीएसटी वगळून) शुल्क द्यावे लागतात. 


शिल्लक रकमेचा नियम 

अाता एसबीअायच्या ग्राहकांना मोफत एटीएम व्यवहार करायचे असतील तर त्यांना अापल्या खात्यात बँकेने ठरवेली कमीत कमी शिल्लक रक्कम ठेवावी लागणार अाहे. शिल्लक रकमेचा नियम ठेवणाऱ्या ग्राहकांना स्टेट बँक अाॅफ इंडिया समूहाच्या दुसऱ्या बँकांच्या एटीएममधूनही मोफत व्यवहार करता येणार अाहेत. सध्या १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात ठेवणाऱ्या खातेधारकांना अमर्यादित मोफत व्यवहार करता येतात. या ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधूनही मोफत व्यवहार करता येतात. 



हेही वाचा - 

३१ डिसेंबरच्या आत तुमचे ATM कार्ड बदलून घ्या, नाहीतर...

५ डिसेंबरपासून पॅनकार्डमध्ये होणार 'हे' सहा बदल




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा