Advertisement

५ डिसेंबरपासून पॅनकार्डमध्ये होणार 'हे' सहा बदल

पॅनकार्डमध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी अनेकांनी अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार पॅनकार्डमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याची माहिती प्रत्येकाला असणं आवश्यक आहे.

५ डिसेंबरपासून पॅनकार्डमध्ये होणार 'हे' सहा बदल
SHARES

आर्थिक व्यवहारांसाठी आणि इतर सरकारी कामकाजात ओळखपत्र म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पॅनकार्डमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागानं याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार ५ डिसेंबरपासून पॅनकार्डसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.

पॅनकार्डमध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी अनेकांनी अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार पॅनकार्डमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याची माहिती प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. या बदललेल्या नियमांबद्दल अाम्ही तुम्हाला सांगणार अाहोत. 


पॅनकार्डमध्ये होणारे बदल

१) पॅनकार्डवर वडिलांचं नाव लिहिणं अनिवार्य असणार नाही. या अगोदर वडिलांचं नाव बंधनकारक होतं. मात्र, यापुढे पॅनकार्डसाठी अर्ज करताना वडिलांचं नाव लिहिण्याची अट प्राप्तीकर विभागानं रद्द केली आहे.

२) आई एकमेव पालक (सिंगल पॅरेंट) असलेल्या अर्जदारांसाठी सुधारीत नियम दिलासादायक आहेत. या अर्जदारांना फक्त आईचं नाव पॅनकार्डवर लावण्याची इच्छा असल्यास तसा पर्याय ते निवडू शकतात.

३) आर्थिक वर्षात २.५ लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणाऱ्यांसाठी पॅनकार्ड असणं बंधनकारक असणार आहे. मात्र यासाठी ३१ मे २०१९ पूर्वी पॅनकार्डसाठी अर्ज करणं आवश्यक आहे.

४) आर्थिक वर्षात ५ लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणाऱ्यांकडे पॅनकार्ड नंबर असणं अनिवार्य असणार आहे.

५) घरगुती कंपन्यांना देखील पॅनकार्ड आवश्यक असणार आहे. या कंपन्यांची आर्थिक वर्षात होणारी विक्री, उलाढाल ५ लाखांपेक्षा कमी असली तरी पॅनकार्ड असणं बंधनकारक असणार आहे.

६) करचोरी थांबवण्यासाठी आणि काळा पैसा नियंत्रित करण्यासाठी हे नियम नक्कीच फायदेशीर ठरतील.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा