Advertisement

20 एप्रिलपासून घरबसल्या सोनं खरेदी करता येणार

रिझर्व्ह बँकेचा सल्ला घेऊन केंद्र सरकारने सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2020-21 सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

20 एप्रिलपासून घरबसल्या सोनं खरेदी करता येणार
SHARES

आता 20 एप्रिलपासून घरबसल्या सोनं खरेदी करता येणार आहे. रिझर्व्ह बँकेचा सल्ला घेऊन केंद्र सरकारने सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2020-21 सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 20 एप्रिल ते 2 सप्टेंबरपर्यंत सहा टप्प्यांमध्ये जारी करण्यात येणार आहे.

या योजनेत सोनं खरेदी करण्यासाठीचा पहिला टप्पा 20 ते 24 एप्रिल दरम्यान असणार आहे. याअंतर्गत कमीत कमी 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येऊ शकेल. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. या योजनेतील गुंतवणुकीवर कर सवलतही मिळणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेत गुंतवणुकीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळेल.

 सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेची सुरूवात नोव्हेंबर 2015 मध्ये झाली होती. फिजिकल गोल्डची मागणी कमी करणे त्याचप्रमाणे घरगुती बचतीऐवजी आर्थिक बचत करण्यास प्रोत्साहन देणे, हे याचं उद्दिष्ट्य आहे. घरामध्ये सोने खरेदी करून साठवून ठेवण्याऐवजी तुम्ही सॉव्हरेन गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता आणि कर देखील वाचवू शकता.

सॉव्हरेन गोल्ड बाँड ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गेल्या 3 दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या देण्यात आलेल्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात. आता याकरता ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट करता येणे शक्य आहे. ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास प्रत्येक बाँडमधील प्रति तोळा सोन्यावर 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे.



हेही वाचा -

लॉकडाऊन वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला 17.58 लाख कोटींचा फटका

दादरमध्ये आणखी २ जण कोरोनाग्रस्त

कोरोनाचे धारावीत ५ नवे रुग्ण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा