Advertisement

नोकरदारांना फटका, PPF, NSC चे व्याजदर घटले

लहान बचत योजना वगळून इतर सर्व योजनांवरील व्याजदरांत ०.१० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक भविष्य निधी, राष्ट्रीय बचत योजना, किसान विकासपत्र, सुकन्या योजना आदी अल्पबचत योजनांचा समावेश आहे.

नोकरदारांना फटका, PPF, NSC चे व्याजदर घटले
SHARES

केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांत ०.१० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे दर १ जुलै पासून लागू होणार आहेत. या व्याजदर कपातीमुळे नोकरदारांमध्ये नाराजी पसरली आहे.

कर्जांवरील व्याजात कपात

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात ३ वेळा कर्जांवरील व्यादरांत कपात केली आहे. कर्जांवरील व्याजदरांच्या आधारेच बचत योजनांवरील व्याजदर निश्चित केले जातात. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१९-२० मधील दुसऱ्या तिमाहीत अल्पबचतीच्या व्याजदरांत कपात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

०.१० टक्क्यांची कपात

केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली, त्यानुसार लहान बचत योजना वगळून इतर सर्व योजनांवरील व्याजदरांत ०.१० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक भविष्य निधी, राष्ट्रीय बचत योजना, किसान विकासपत्र, सुकन्या योजना आदी अल्पबचत योजनांचा समावेश आहे.

कुठल्या योजनांचा समावेश?

अर्थमंत्रालयातर्फे दर ३ अल्पबचत योजनांवरील व्याजदरांचा आढावा घेण्यात येतो. या आढाव्यानुसार व्याजदरांत वाढ किंवा कपात केली जाते. व्याजदरांतील नवे बदल जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी लागू असतील. या कपातीमुळे पीपीएफ व राष्ट्रीय बचत योजनेवर ७.९ टक्के व्याज मिळेल. तर, सुकन्या समृद्धी योजना व किसान विकासपत्रांवरील व्याज अनुक्रमे ८.४ व ७.६ टक्के असेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर आता ८.६ टक्के तर, ५ वर्षे मुदतीच्या मुदत ठेवींवर ७.७ टक्के व्याज मिळेल. ५ वर्षे मुदतीच्या आवर्ती ठेवींवर ७.२ टक्के व्याज मिळेल.

टपाल कार्यालयातील बचत खात्यांवरील व्याजदर तेवढाच म्हणजे ४ टक्के ठेवण्यात आला आहे. 


नवे व्याजदर ‘असे’

योजना

व्याजदर

१-३ वर्षांची एफडी

६.९%

५ वर्षांची एफडी

७.७%

आरडी (५ वर्षे)

७.२%

सीनियर सिटीझन स्कीम (५ वर्षे)

८.६%

एमआईएस (५ वर्षे)

७.६%

एनएससी

७.९%

पीपीएफ

७.९%

केव्हीपी

७.९%

सुकन्या समृद्धी

८.४%



हेही वाचा-

प्रसिद्ध गोदरेज कुटुंबात कलह, संपत्तीची होणार वाटणी

अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला मिळालं वर्सोवा-वांद्रे सी लिंकचं कंत्राट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा