गिरगावात भरली ग्राहक पेठ

 Girgaon
गिरगावात भरली ग्राहक पेठ

गिरगाव - आग्रेवाडी येथे आकांक्षा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने गिरगाव ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहक पेठेचा लाभ गिरगावकरांना 19 मार्चपर्यंत घेता येणार आहे. या ग्राहक पेठेचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते रविंद्र मिरलेकर आणि विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते झाले.

ग्राहक पेठेचे आयोजन गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. आकांक्षा प्रतिष्ठान ग्राहक पेठेत 37 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. 

घरात तयार केलेले खाद्य पदार्थ, आयुर्वेदिक औषधे, साडी, ड्रेसपीस, घरात तयार केलेल्या नऊवारी साड्यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. गिरगावकरांनी या ग्राहक पेठेत मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. ग्राहक पेठ उपक्रमाद्वारे महिला उद्योजकांना वाव मिळावा हा यामागचा उद्देश आहे, असे संस्थांचे अध्यक्ष सुदीप नाईक यांनी सागितले.

Loading Comments