Advertisement

रात्री 12 वाजल्यानंतर तुमचं आयुष्य बदलणार आहे!


रात्री 12 वाजल्यानंतर तुमचं आयुष्य बदलणार आहे!
SHARES

शुक्रवारी रात्री 12 नंतर तुमचं आयुष्य बदलणार आहे! होय. कारण रात्री 12 वाजल्यानंतर देशभरात जीएसटी अर्थात एक करप्रणाली लागू होणार आहे. यामध्ये सर्व वस्तू व सेवा कर एकत्रित करण्यात आले आहेत. त्यामुळे अगदी रात्री 11 वाजता जर तुम्ही कोणता व्यवहार करत असाल आणि तो 12 वाजेच्या पुढे जाऊन संपला, तर कदाचित तुम्हाला त्या व्यवहारावर वाढीव कर अर्थात जीएसटी भरावा लागण्याची शक्यता आहे!



हॉटेल, बससेवा, किंवा मोबाईल रिचार्ज अशा प्रकारच्या सेवा जर तुम्ही रात्री 12 वाजेच्या आसपास वापरत असाल, तर तुम्हाला त्यावर अतिरिक्त जीएसटी भरावा लागणार आहे.




हॉटेल-

जर तुम्ही शुक्रवारी हॉटेलमध्ये जेवायला गेलात आणि तुमचे बिल रात्री 12 नंतर तयार होत असेल तर तुमच्या बिलावर जीएसटी चार्ज लागेल. त्यामुळे 12 वाजेच्या आधी मेन्यूकार्डमध्ये असलेल्या मेन्यूच्या किंमती 12 नंतर लागू असणार नाहीत.

कॅब सर्व्हिस-

जर तुम्ही कॅब बुक करत असाल आणि रात्री 12 वाजल्यानंतर पैसे देणार असाल तर त्यातही जीएसटी लागू होईल. अर्थात तुम्ही जर रात्री 12 वाजेच्या आधी कॅब बुक केलीत आणि तुमचा प्रवास रात्री 12 नंतर संपला, तर तुम्हाला संबंधित कॅब कंपनीने मान्य केलेल्या बिलापेक्षा अतिरिक्त रक्कमही अदा करावी लागेल.

मोबाईल बिल आणि रिचार्ज

महिन्याच्या शेवटी सामान्यपणे आपले मोबाईल बिल तयार होते. मात्र तुम्ही त्या बिलामध्ये आलेली रक्कमच अंतिम धरुन चाललात, तर तुम्ही चूक करत आहात. कारण 30 तारखेला आलेलं बिल तुम्ही 1 जुलैनंतर भरणार असाल, तर तुम्हाला बिलाच्या रकमेमध्ये अतिरिक्त जीएसटी भरावा लागणार आहे.

याव्यतिरिक्त अजून अशा अनेक सेवा आहेत ज्या जीएसटीमुळे महागणार असून काही सेवा या स्वस्तही झाल्या आहेत.

 स्वस्त
काय महाग
तांदूळ
शाम्पू
गहू
सिगारेट
दूध
पानमसाला
अनपॅक बेसन
टायर
डाळ
प्लास्टिकच्या वस्तू
मीठ
सोने
दही
परफ्यूम
पनीर
घरभाडे
भाज्या
मेट्रो प्रवास
झाडू
वाय-फायसेवा
धान्य
डीटीएच
पापड
बटर
ब्रेड
रेझर
मध
व्हिडिओ गेम
गूळ
प्लास्टर
लस्सी
पेय
मिठाई
स्कूल फी
शाळेचे दप्तर
पेय
पतंग
सुकामेवा
चित्रकलेची वही
बटर
सिल्क
चीज
रेशम आणि कॉटन कापड
बँकिंग सेवा
चपला
ऑनलाईन तिकीट बुकिंग
विटा
मोबाईल बिल
हेअर ऑईल
कुरियर सेवा
चष्म्याच्या काचा
हॉटेलचे जेवण
एलपीजी स्टोव्ह

चित्रपट, नाटकांची तिकिटे

ट्रेनचा जनरल आणि स्लिपर प्रवास

घरांच्या किमती

दुचाकी

कार
अॅल्युमिनियम भांडी
तांब्याची भाडी
बांगड्या
गर्भनिरोधक औषधे




हेही वाचा

जीएसटी आला, पण 761 औषधांवर फारसा परिणाम नाही !



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा