Advertisement

एचडीएफसीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन


एचडीएफसीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन
SHARES

मुंबईतील एचडीएफसी बँकेच्या सर्व कंत्राटी कमगारांनी सोमवारी अचानक संपाचं हत्यार उपसलं. सोमवारी सकाळी या बँकेच्या सर्व शाखांमधील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन करून बँकेचं कामकाज ठप्प पाडलं. सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करणं आणि किमान वेतन मिळावं, या मागणीसाठी कंत्राटी कामगारांनी एल्गार पुकारला आहे आहे.


चेक जमा नाही होणार?

कामबंद आंदोलन पुकारणारे कामगार हे क्लेअरिकल विभागातील आहेत. ज्यांच्याकडे प्रामुख्याने एका बँकेतील धनादेश (चेक) दुसऱ्या बँकेत नेऊन जमा करण्याची जबाबदारी आहे. या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने चेक जमा करण्याचं कामही पूर्णपणे ठप्प झालं आहे. यामुळे बँक ग्राहकांचे व्यवहार खोळंबण्यासोबतच बँकेला मोठ्या दंडाचा भुर्दंडही सहन करावा लागण्याची शक्यता आहे.



बँक ग्राहकांची गैरसोय

एचडीएफसी बँकेच्या मुंबईतील सर्व शाखांमधील कंत्राटी कामगारांनी संप पुकरल्याने सोमवारी बँकेत आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. सुमारे ७५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी आणि पक्षाचे सहसरचिटणीस सचिन गोळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आलं.


प्रमुख मागणी काय?

कंत्राटदारामुळे कर्मचाऱ्यांची पगारवाढ रखडल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप असून हा कंत्राटदार सर्वात पहिल्यांदा बदला, अशी त्यांची मागणी आहे. सर्व कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचं धुरी यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील सर्व शाखांमधील कंत्राटी कामगार शिवाजी पार्क येथील मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या कार्यालायत जमा झाले होते.



हेही वाचा-

बँकांच्या सुट्टीचा व्हायरल मेसेज खोटा!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा