Advertisement

एचडीएफसीच्या नेट-मोबाईल बँकिंगमध्ये घोळ, ग्राहकांना प्रचंड मनस्ताप

बँकेच्या अनेक ग्राहकांची इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सेवा मंगळवारी काम करत नव्हती. ट्विटरवर अनेक ग्राहक एचडीएफसी बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगसमोरील अडचणींबद्दल ट्विट करीत आहेत.

एचडीएफसीच्या नेट-मोबाईल बँकिंगमध्ये घोळ, ग्राहकांना प्रचंड मनस्ताप
SHARES

देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या काही ग्राहकांना मंगळवारी इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग वापरण्यात अडचणी येत आहेत. ग्राहकांना या सुविधांचा योग्य प्रकारे फायदा घेता येत नाही. ग्राहकांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर ही समस्या सोडविण्याचे काम करीत असल्याचं बँकेने सांगितलं आहे. 

बँकेच्या अनेक ग्राहकांची इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सेवा मंगळवारी काम करत नव्हती.  याबाबत या ग्राहकांनी ग्राहक सोशल मीडियावर पोस्ट केल्या.  ट्विटरवर अनेक ग्राहक एचडीएफसी बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगसमोरील अडचणींबद्दल ट्विट करीत आहेत. ग्राहकांच्या या समस्येची दखल बँकेने तात्काळ घेतली. याबाबत बँकेनेही ट्विट केलं आहे.

बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'काही ग्राहकांना आमचे नेट बँकिंग / मोबाइल बँकिंग अ‍ॅप वापरण्यात त्रास होत आहे. हे सोडविण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करत आहोत. असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि ग्राहकांनी पुन्हा प्रयत्न करावेत ही विनंती. धन्यवाद.'



हेही वाचा -

  1. ३१ मार्चपर्यंत करा 'ही' १० महत्वाची कामं, अन्यथा खिशाला पडेल मोठा भुर्दंड

  1. १ एप्रिलपासून पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी शुल्क
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा