Advertisement

क्रेडिट कार्डवर द्यावे लागतात हे ७ शुल्क, बँका अनेकदा लपवतात माहिती

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पैशांची गरज भागविण्यासाठी क्रेडिट कार्ड हे एक चांगलं माध्यम आहे. मात्र, या कार्डशी संबंधित काही शुल्क आहेत जे खूप जास्त आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणार्‍यांना या शुल्कांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

क्रेडिट कार्डवर द्यावे लागतात हे ७ शुल्क, बँका अनेकदा लपवतात माहिती
SHARES

शहरी लोकांमध्ये क्रेडिट कार्ड अधिक लोकप्रिय होत आहेत. आजकाल बरेच लोक क्रेडिट कार्डमध्ये मिळणाऱ्या सुविधांमुळे ते वापरण्यास प्राधान्य देतात. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पैशांची गरज भागविण्यासाठी क्रेडिट कार्ड हे एक चांगलं माध्यम आहे. मात्र, या कार्डशी संबंधित काही शुल्क आहेत जे खूप जास्त आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणार्‍यांना या शुल्कांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

वार्षिक देखभाल शुल्क

क्रेडिट कार्डासाठी लागू होणारी ही वार्षिक देखभाल फी आहे. जेव्हा विनामूल्य क्रेडिट कार्ड दिले जाते तेव्हा जॉइनिंग फी आणि वार्षिक शुल्क माफ केले जाते. मात्र, ही सूट केवळ ठारवीत कालावधीसाठी देण्यात आलेली असते.

व्याज शुल्क

मासिक क्रेडिट कार्ड बिलामध्ये एकूण देय रक्कम आणि किमान देय रक्कम नमूद असते. उर्वरित रक्कम नंतर दिली जाऊ शकते असे गृहीत धरून लोक बर्‍याच वेळा कमीत कमी देय रक्कम देण्याचा पर्याय निवडतात. पण हे तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात अडकवेल. बँका सहसा थकीत रकमेवर मासिक ३ ते ४ टक्के दराने व्याज आकारतात. परंतु क्रेडिट कार्डासाठी व्याज खूपच जास्त म्हणजे वार्षिक ३६ टक्के ते ४८ टक्के असते. 

जीएसटी

सध्याच्या जीएसटी दराप्रमाणे क्रेडिट कार्ड अंतर्गत केलेले सर्व व्यवहार जीएसटीच्या अंतर्गत येतात.

लेट फी

जर एखाद्या व्यक्तीने वेळेवर देय रक्कम भरली नाही तर बँक अतिरिक्त शुल्क आकारते. याला 'लेट पेमेंट चार्ज' म्हणतात. देय तारखेनंतर पैस भरल्यास दिल्यास  'लेट पेमेंट चार्ज' भरावा लागतो. 

ओव्हरड्राफ्ट शुल्क

जेव्हा एखादा ग्राहक त्यांच्या क्रेडिट कार्डवर निश्चित केलेल्या मासिक क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतो तेव्हा ओव्हरड्राफ्ट शुल्क त्याला द्यावे लागते. 

पेट्रोल शुल्क

ट्रेनची तिकिटे आणि पेट्रोल खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरल्यास जादा शुल्क आकारले जाते.

एटीएममधून पैसे काढण्यावर शुल्क

ग्राहकांना एटीएममधून क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढण्याची सुविधा देखील आहे. मात्र, अशा व्यवहारासाठी शुल्क द्यावे लागते. हे शुल्क आपण काढलेल्या रकमेच्या २.५ टक्के आहे. याशिवाय जेवढे पैसे काढतो त्यावरही व्याज द्यावे लागते.  हे व्याज वार्षिक ३६ टक्क्यांपासून ४८ टक्क्यांपर्यंत असते.



हेही वाचा-

महिलांसाठी योग्य आर्थिक नियोजन आवश्यक, आर्थिक सुरक्षेसाठी लक्षात घ्या ह्या ७ बाबी

लग्नाआधीच नवरी पळून गेल्यास मिळेल विमा, जाणून घेऊया लग्न विम्याबद्दल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा