Advertisement

महिलांसाठी योग्य आर्थिक नियोजन आवश्यक, आर्थिक सुरक्षेसाठी लक्षात घ्या ह्या ७ बाबी

पुरुष आणि स्त्रिया यांचे आर्थिक नियोजन समान नाही, म्हणून त्यांचे आर्थिक नियोजन देखील वेगळे असले पाहिजे.

महिलांसाठी योग्य आर्थिक नियोजन आवश्यक, आर्थिक सुरक्षेसाठी लक्षात घ्या ह्या ७ बाबी
SHARES

आज कोणत्याही क्षेत्रात पुरुष महिलांपेक्षा मागे नाहीत. परंतु आर्थिक बाबींमध्ये महिला पुरुषांपेक्षा मागे असतात. महिलांनी त्यांच्या करियरबरोबर बचत आणि गुंतवणूकीवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. याद्वारे, त्या भविष्यासाठी योग्य नियोजन करण्यास सक्षम असतील. नोकरी करणाऱ्यांनी महिलांनी योग्य आर्थिक नियोजनासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात. 

पुरुषांपेक्षा महिलांना कमी पगार

पुरुष आणि स्त्रिया यांचे आर्थिक नियोजन समान नाही, म्हणून त्यांचे आर्थिक नियोजन देखील वेगळे असले पाहिजे. एका जागतिक अभ्यासानुसार,  २०१९ मध्ये एखाद्या पुरुषाला १०० रुपये पगार मिळाल्यास त्या महिलेला केवळ ७९ रुपये मिळतात. म्हणजे सुमारे २१ टक्के कमी. म्हणूनच, कमी उत्पन्न विचारात घेतल्यास महिलांनी चांगला गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करुन पैसे मिळवणे आणि पैसे जोडणे अधिक महत्वाचे आहे. जेणेकरून अल्पावधीतच स्वत: साठी पुरेसा निधी जमा होईल.

महिलांच्या कारकीर्दीत बरेच चढउतार 

बर्‍याच वेळा महिलांचा करिअरचा आलेख नेहमीच वाढत नाही. बर्‍याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे करिअरपासून ब्रेक घ्यावा लागू शकतो. काही लग्नानंतर नोकरी सोडतात, काही गर्भावस्थेदरम्यान किंवा नंतर. यामुळे करियरच्या वाढीवर आणि उत्पन्नावरही परिणाम होतो. निवृत्तीसाठी पैसे उभे करण्यावर परिणाम होऊ शकतो. ही तफावत कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी गुंतवणूकीचे चांगले नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.

स्त्रियांमध्ये आर्थिक साक्षरता कमी

ग्लोबल फायनान्शियल लिटरसी एक्सलन्स सेंटरने २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगभरातील केवळ २० टक्के महिलांना आर्थिक संकल्पनेची जाणीव आहे. हे पुरुषांपेक्षा ८ टक्के कमी आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे एखाद्या व्यक्तीला अर्थसंकल्प, पैसे वाचवणे, खर्च नियंत्रित करणे, कर्ज हाताळणे, सेवानिवृत्तीची योजना आखणे आणि मालमत्ता जोडणे याविषयी चांगले ज्ञान असते. म्हणून आपण आर्थिक नियोजन बद्दल वाचणे किंवा एखाद्या तज्ञाशी बोलणे महत्वाचे आहे. यातून आपल्याला बचत आणि गुंतवणूकीचं ज्ञान मिळेल. 

आपत्कालीन निधी आवश्यक 

सेवानिवृत्तीसाठी पैसे जोडण्याव्यतिरिक्त, आपणास नोकरी सोडण्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी देखील तयार असले पाहिजे. या आपत्कालीन निधीने आपल्या किमान ६ महिन्यांच्या पगाराची तरतूद करावी. हे आपल्याला कोरोना सारख्या वाईट काळाचा सामना करण्यास मदत करेल.

खर्चाचा हिशोब ठेवा

बचत किंवा गुंतवणूकीबरोबरच आपण आपल्या खर्चाचा हिशोब ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. कारण स्त्रियांचे खर्च आणि गरजा पुरुषांपेक्षा भिन्न आहेत.  खर्चाचा हिशेब ठेवल्यास त्यांच्या बचतीची कल्पना येणे त्यांना सुलभ होईल आणि अधिक बचत करण्यास महिला सक्षम होतील. 

 सेवानिवृत्तीचे नियोजन आवश्यक 

जनगणना कार्यालयाच्या नमुना नोंदणी प्रणालीअंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात महिला पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात. यामुळे त्यांचा निवृत्तीचे नियोजन कालावधीही वाढतो. जोडीदाराचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात.  या बाबबी  लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे.

दीर्घकालीन आरोग्य विमा 

जर तुम्ही एकट्या महिला असाल तर दीर्घकालीन आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. आपल्याला वृद्ध झाल्यावर याची आवश्यकता असेल. विशेषत: जेव्हा कोणी आपली काळजी घेण्यासाठी नसेल. अशा दीर्घकालीन आरोग्य विम्याचे प्रीमियम जरी जास्त असले तरी आपण जितक्या लवकर तो घेताल तितका कमी प्रीमियम असेल. 



हेही वाचा -

१ नोव्हेंबरपासून सिलेंडरच्या होम डिलिव्हरीची प्रक्रिया बदलणार

पीएफसाठी आता व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन सेवा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा