हॉटेल विनयची 'विनम्रता', 'मेन्यूकार्ड' केले स्वस्त!

Girgaon
हॉटेल विनयची 'विनम्रता', 'मेन्यूकार्ड' केले स्वस्त!
हॉटेल विनयची 'विनम्रता', 'मेन्यूकार्ड' केले स्वस्त!
हॉटेल विनयची 'विनम्रता', 'मेन्यूकार्ड' केले स्वस्त!
See all
मुंबई  -  

देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हॉटेलमालकांनी खाद्यपदार्थांचे दर (जीसएसटीच्या नव्या दरांनुसार) वाढवून ग्राहकांचे खिसे कसे कापले? याचा नमुना पेश करणाऱ्या बिलाचे फोटो सर्वच सोशल नेटवर्किंग साईट्वर व्हायरल व्हायला लागले. यामध्ये मुंबईतील अनेक नामांकित हॉटेल्सचाही समावेश होता.

हॉटेलातील हे वाढलेले दर पाहून आता आपल्या पेटपुजेचे काय? असा प्रश्न सर्वसामान्य खाद्यप्रेमींना सतावायला लागला. पण चिंता नसावी! कारण मुंबईत असेही एक हॉटेल आहे ज्याने खरोखरच जीएसटीची अंमलबजावणी करुन ग्राहकांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करुन दिले आहेत.


देशभरात चर्चा

सध्या या हॉटेलाची केवळ मुंबईतच नव्हे, तर देशभरात चर्चा सुरू आहे. या हॉटेलच्या दराचेच नाही, तर त्यामागच्या विचारसरणीचेही अनुकरण केल्यास ग्राहकांना नक्कीच समाधान मिळेल, असे म्हटले जात आहे. या हॉटेलचे नाव आहे 'हॉटेल विनय'.10 टक्के स्वस्त!

एका बाजूला जीएसटीच्या नावावर इतर हॉटेल, रेस्टॉरंट मालक ग्राहकांच्या खिशाला कात्री मारुन गल्ला जमवत असताना, गिरगावातील 76 वर्ष जुन्या हॉटेल विनयने ग्राहकांशी एकनिष्ठ राहत खाद्यपदार्थांचे दर थोडेथोडके नव्हे, तर 10 टक्क्यांनी कमी करुन दाखवले आहेत!


मेन्यूकार्डमध्ये नवे, जुने दर

इतर हॉटेल आणि आपल्यातील फरक स्पष्टपणे दाखवून देण्यासाठी 'हॉटेल विनय'ने नवे मेन्यूकार्ड तयार केले आहे. या नव्या मेन्यूकार्डमध्ये जुने आणि नवीन दर ठळकपणे छापण्यात आले आहेत.ग्राहकांना प्राधान्य

आमच्यासाठी ग्राहकच सर्वात महत्वाचा आहे. मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या मॅनेजरपासून टॅक्सी ड्रायव्हरपर्यंत सर्व आर्थिक स्तरातील ग्राहक आमच्या हॉटेलमध्ये जेवायला येतात. एकदा खाऊन गेल्यानंतर थेट 15 दिवसांनी येईल, असा आमचा 'हायवे' वरचा ग्राहक नाही. आमचा ग्राहक दररोजचा आहे. त्यांच्यावर जीएसटीचा भार टाकून आम्हाला त्यांना तोडायचे नाही. म्हणूनच आम्ही प्रत्येक खाद्यपदार्थांमागे 5 रुपये कमी केले आहेत.


- अनिल टेंबे, मालक, हॉटेल विनयहा आहे नियम

जीएसटी येण्याअगोदर सर्वच रेस्टॉरंट, हॉटेलांमधील खाद्यपदार्थांच्या बिलात व्हॅट, सर्विस टॅक्स, सर्विस चार्जेस आणि नफ्याचा समावेश असायचा. मात्र जीएसटी आल्यानंतर नफाआधारीत खाद्यपदार्थांची मूळ किंमत आणि जीएसटी दर बिलावर वेगवेगळे छापणे बंधनकारक करण्यात आले.अशी चतुराई 

पण या मालकांनी चतुरपणे सर्व करांचा समावेश असलेल्या जुन्या किंमती तशाच ठेवून त्यावर जीएसटी आकारण्यास सुरुवात केली. परिणामी 'मेन्यूकार्ड' महागले आहे. देशातील सर्वच व्यापाऱ्यांनी नियमानुसार जुने दर आणि नवे दर स्पष्टपणे छापूनच व्यापार करण्याचे आवाहन केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी मंगळवारी केले होते. पण मुंबईतील 'हॉटेल विनय' वगळता इतर हॉटेल, रेस्टॉरंट्स या नियमाकडे दुर्लक्षच करताना दिसत आहेत.


व्हायरल व्हावे

'हॉटेल विनय'ने ग्राहकांसोबत दाखवलेला हा प्रामाणिकपणाही मोठ्या संख्येने व्हायरल झाल्यास इतर हॉटेल, रेस्टॉरंट्सवरही किंमती कमी करण्याचा दबाव तयार होईल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी.
हेही वाचा

जीएसटीचा भार आता सामान्यांच्या माथी!

जीएसटी आला, पण 761 औषधांवर फारसा परिणाम नाही !


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.