आषाढीला करा जीएसटी फ्री 'पोटोबा'!

  मुंबई  -  

  आषाढी एकादशी म्हटलं की, डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी! वर्षातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटल्याचे म्हटले जाते. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आषाढी एकादशीला उपवास करतात. हेच निमित्त साधून आषाढी एकादशीला माहिमच्या पोटोबा हॉटेलने ग्राहकांना जीएसटी फ्री जेवण द्यायचा निर्णय घेतलाय.


  सवलत एकादशीपुरतीच

  भाविकांच्या व्रताला हातभार लावण्याच्या उद्देशाने माहिमच्या 'पोटोबा' उपहारगृहाने त्यांना 'जीएसटी'मुक्त खाद्यपदार्थ देण्याचे ठरवले आहे. ही सवलत केवळ आषाढी एकादशीपुरतीच असेल.


  मन जिंकण्याचा मार्ग पोटातूनच

  मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो, असे म्हणतात. पोट भरल्यानंतरच बौद्धिक, मानसिक आदी भुकांची जाणीव होते. त्यामुळेच आधी 'पोटोबा' मग 'विठोबा' अशी म्हणही प्रचलित आहे. याची पुरेपूर जाणीव असलेल्या 'पोटोबा'ने ग्राहकांचे मन जिंकण्याच्या उद्देशाने हे सवलत दिली आहे.

  भाविकांनी उपवासाचे कोणतेही खाद्यपदार्थ मागवल्यास त्या खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्यात येणार नाही. बिलामध्ये भलेही जीएसटी आकारलेला दिसत असला, तरी ग्राहकांना ते पैसे परत करण्यात येतील.


  उपवासाच्या पदार्थावरील 'जीएसटी' पोटोबा भरणार आहे. ही ऑफर फक्त आषाढी एकादशी पुरतीच मर्यादित आहे. ग्राहकांनी या ‘जीएसटी फ्री आषाढी एकादशी’चा लाभ घ्यावा.


  - पराग इनामदार, संचालक, पोटोबा  हे देखील वाचा -

  पाऊस, भजी आणि बरंच काही!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.