एचपी, एचएसबीसी करणार 'इतक्या' कर्मचाऱ्यांची कपात

एच.पी. इंडियाचे जगभरात ५५,००० कर्मचारी आहेत. नफा वाढण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ही कपात केली जाणार आहे.

SHARE

पर्सनल कॉम्प्युटर आणि प्रिंटर बनवणारी एचपी कंपनी भारतासह जगभरात कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. कंपनी भारतातून ५०० कर्मचारी काढण्याची शक्यता आहे. तर जगभरातील कंपनीच्या ९ हजार कर्मचाऱ्यांवर गंडातर येऊ शकतं. तर जगातील एक मोठी बँक असलेली एचएसबीसी बँकही जगभरात १० हजार कर्मचारी कमी करणार आहे. 

एच.पी. इंडियाचे जगभरात ५५,००० कर्मचारी आहेत. नफा वाढण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ही कपात केली जाणार आहे. मागील आठवड्यातच कंपनीने २०२० पर्यंत जगभरातील ७ ते ९ हजार कर्मचारी काढले जातील, असं म्हटलं होतं. भारतातील किती कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.  खासगी संगणकांच्या मागणीत सातत्याने घट आहे. कंपनीने काही मॉडल्सचं उत्पादन थांबवलं आहे. 

एचएसबीसीने या आधी ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याची घोषणा केली होती. गेल्या महिन्यातच बँकेने अचानकपणे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन फ्लिन्ट यांना त्यांच्या पदावरून हटविण्याची घोषणा केली होती. ते केवळ १८ महिने या पदावर राहिले होते.हेही वाचा -

प्लिपकार्ट, अॅमेझाॅनची बंपर आॅफर, दिवाळी सेल 'या' तारखेपासून सुरू
संबंधित विषय
ताज्या बातम्या