मुंबई सर्कलमध्ये आयडियाची 4 जी सेवा सुरू

 Mumbai
मुंबई सर्कलमध्ये आयडियाची 4 जी सेवा सुरू

देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी दूरसंचार कंपनी आयडिया सेल्युलरने मुंबई सर्कलमध्ये 4G सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना मोफत 10 जीबी 4 जी डाटा देईल. तर नव्या ग्राहकांसाठी हा प्लान पहिल्या तीन महिन्यांसाठी असेल.

आयडिया सध्या मुंबईत 44 लाख ग्राहकांना सेवा देत आहे. उत्पन्नाच्या हिशेबाने कंपनीचा शहरातील वाटा 10.2 टक्के आहे. आयडिया मुंबईत आतापर्यंत 3 जी आणि 2 जी सेवा देत होती. मात्र जियोच्या आगमनामुळे दूरसंचार बाजारातील स्पर्धा तीव्र झाल्याने आयडियानेही आपल्या ग्राहकांना 4 जी सेवा देणे सुरू केले आहे. आयडिया आणि व्होडाफोनने विलनीकरणाद्वारे जियोला टक्कर देण्याचे ठरवले आहे.

Loading Comments