मुंबईत 'होम फर्निशिंग स्टोअर' सुरू करणार 'आयकेईए'

 Navi Mumbai
मुंबईत 'होम फर्निशिंग स्टोअर' सुरू करणार 'आयकेईए'
Navi Mumbai  -  

'होम फर्निशिंग' क्षेत्रातील नामांकित कंपनी 'आयकेईए' 2019 मध्ये मुंबईत आपले पहिले स्टोअर सुरू करणार आहे. संपूर्ण देशभरात साखळी पद्धतीने स्टोअर सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील एका कार्यक्रमात कंपनीने ही घोषणा केली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्टोअर सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि 'आयकेईए'त सामंजस्य करार देखील झाला आहे.

'आयकेईए' एक स्वीडिश कंपनी असून ती 'होम फर्निशिंग' क्षेत्रात कार्यरत आहे. अापल्या उत्पादनांच्या किरकोळ विक्रीसाठी महाराष्ट्र एक मोठी बाजारपेठ असल्याचे कंपनीचे मत आहे. त्यानुसार भविष्याच्या दृष्टीने कंपनी योजना आखत आहे. नवी मुंबईतील स्टोअर 4,30,000 चौ.फूट क्षेत्रफळाचे असेल. यातून रोजगाराला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे.

Loading Comments