Advertisement

आयटी रिटर्न भरण्यासाठी आणखी मुदत, 'ही' आहे नवीन तारीख तारीख

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख पुन्हा वाढवली आहे.

आयटी रिटर्न भरण्यासाठी आणखी मुदत, 'ही' आहे नवीन तारीख तारीख
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने इनकम टॅक्स (आयटी) रिटर्न भरण्याची अखेरची तारीख पुन्हा वाढवली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील इनकम टॅक्स रिटर्न आता ३१ डिसेंबरपर्यंत जमा करता येणार आहे. याआधी ही तारीख ३० नोव्हेंबर होती.

१३ मे रोजी आयकर भरण्यासाठी निश्चित केलेली ३१ जुलैपर्यंतची तारीख वाढवून ३० नोव्हेंबर केली होती. कोरोना संकटामुळे करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंतचा कालावधी वाढवण्यात येत असल्याचं यावेळी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं म्हटलं होतं.

प्राप्तीकर अधिनियमानुसार ज्यांच्या खात्यांचं ऑडिट करणं आवश्यक आहे, अशा करदात्यांसाठी आयकर विवरणपत्र देण्याची तारीख ३१ ऑक्टोबरऐवजी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी  ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे. याआधी ही तारीख ३० सप्टेंबर होती.

कोरोनाच्या संकटामुळे आयकर भरण्यासाठी कालावधीत केंद्र सरकारकडून तब्बल चार वेळा वाढवण्यात आला आहे. यापूर्वी ३१ मार्चवरून ३० जून करण्यात आला होता. त्यानंतर ३१ जुलै आणि नंतर ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.



हेही वाचा -

एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार ओटीपी

महिलांसाठी योग्य आर्थिक नियोजन आवश्यक, आर्थिक सुरक्षेसाठी लक्षात घ्या ह्या ७ बाबी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा