Advertisement

एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार ओटीपी

स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) च्या ग्राहकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयच्या ग्राहकांना आता ओटीपी टाकल्याशिवाय एटीएममधून पैसै काढता येणार नाहीत.

एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार ओटीपी
SHARES

स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) च्या ग्राहकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयच्या ग्राहकांना आता ओटीपी टाकल्याशिवाय एटीएममधून पैसै काढता येणार नाहीत. ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी पैसे काढण्याबाबत एसबीआयने नवीन नियम केला आहे. 

नवीन नियमानुसार, एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून १० हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रक्कम बँकेच्या एटीएममधून काढण्यासाठी ओटीपी आवश्यक असणार आहे. एसबीआयने ट्वीट करत नवीन नियमांची माहिती दिली आहे.  ट्विटनुसार, आतापासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना वन टाइम पासवर्ड टाकावा लागणार आहे. ओटीपीशिवाय ग्राहकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा नियम आता २४ तासांसाठी लागू करण्यात आला आहे. याआधी एसबीआयने ओटीपी आधारित एटीएम सेवा सकाळी ८ ते रात्री ८ अशी १२ तासांसाठी सुरू केली होती. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना एटीएम स्क्रीनवरील रकमेसह ओटीपी स्क्रीनही दिसेल. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो टाकल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील.

 कोरोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आर्थिक गुन्ह्यांचं प्रमाण मोठं आहे. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांचे आर्थिक गैरव्यवहारांपासून संरक्षण करणे, तसंच अनधिकृत व्यवहारांवर वचक ठेवण्यासाठी बँकेने ही ओटीपी आधारित सुविधा चोवीस तास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.हेही वाचा -

एसबीआयची गृहकर्ज व्याजदरात सवलत

लग्नाआधीच नवरी पळून गेल्यास मिळेल विमा, जाणून घेऊया लग्न विम्याबद्दलRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा