Advertisement

एसबीआयची गृहकर्ज व्याजदरात सवलत

एसबीआयने याआधी रिटेल ग्राहकांसाठी चारचाकी, सोने, वैयक्तिक कर्जावर १०० टक्के प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.

एसबीआयची गृहकर्ज व्याजदरात सवलत
SHARES

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्ज व्याजदरात ०.२५ टक्क्याची सवलत जाहीर केली आहे. गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या सिबिल स्कोअरनुसार आणि योनोच्या माध्यमातून अर्ज केल्यास ही सवलत मिळणार आहे. व्याजदरातील ०.२५ टक्क्याची सवलत ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या घरावर लागू असणार आहे. एसबीआय ३० लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावर ६.९० टक्के तर ३० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी ७ टक्के व्याज दर आकारत आहे.

याशिवाय एसबीआय ३० लाख ते २ कोटी रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावर ०.२० टक्के सवलत देणार आहे. याआधी ही सवलत ०.१० टक्के होती. ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरनुसार ही सवलत दिली जाणार आहे. आठ मेट्रो शहरांतील गृह कर्ज ग्राहकांना हीच सवलत तीन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज रकमेवर असेल. योनोच्या माध्यमातून अर्ज केल्यास सर्व गृह कर्जांसाठी ०.५ टक्क्याची अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे.

एसबीआयने याआधी रिटेल ग्राहकांसाठी चारचाकी, सोने, वैयक्तिक कर्जावर १०० टक्के प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. रिटेल ग्राहकांना आता ७.५ टक्क्यांपासून सुरू होणारे वाहन कर्ज मिळेल. सोने कर्ज आणि वैयक्तिक कर्ज ग्राहकांनाही अनुक्रमे ७.५ टक्के आणि ९.६ टक्के व्याजदर असेल. हेही वाचा -

महिलांसाठी योग्य आर्थिक नियोजन आवश्यक, आर्थिक सुरक्षेसाठी लक्षात घ्या ह्या ७ बाबी

लग्नाआधीच नवरी पळून गेल्यास मिळेल विमा, जाणून घेऊया लग्न विम्याबद्दलसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा