Advertisement

देशाच्या सोने आयातीत मोठी वाढ

भारत हा जगात चीननंतर सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारतात दागिन्यांसाठी सोन्याचा वापर केला जातो.

देशाच्या सोने आयातीत मोठी वाढ
SHARES

देशातील सोन्याच्या आयातीत एप्रिल-जून तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चालू खात्यातील तूट आणखी वाढली आहे. चांदी आयातीत मात्र मोठी घसरण झाली आहे.

एप्रिल-जून तिमाहीत सोन्याची आयात ७.९ अब्ज डॉलर्सनी वाढून ५८,५७२.९९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिकपट सोन्याची आयात नोंदवण्यात आली होती. 

भारत हा जगात चीननंतर सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारतात प्रामुख्याने दागिन्यांसाठी सोन्याचा वापर केला जातो. त्यासाठी दरवर्षी ८०० ते ९०० टन सोने आयात केले जाते. तर दुसरीकडे एप्रिल-जून तिमाहीत चांदीची आयात ९३.७ टक्क्यांनी घसरून ३.९१ कोटी डॉलर्स इतकी राहिली.

कोरोना संकटामुळे एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था रोडावली असताना परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे देशाला मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या दरात  झालेल्या मोठ्या घसरणीमुळे हा परिणाम पाहायला मिळत आहे. १८ जूनला परकीय चलन गंगाजळी ४.१४८ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवरुन ६०३.९३३ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा