Advertisement

लघु, मध्यम उद्योगांसाठी महाराष्ट्र - थायलंडने सहकार्य वाढवावे - सुभाष देसाई

थायलंड येथील जनरल कौन्सिल तसेच उद्योजकांचे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर असून शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे लघु व मध्यम उद्योगावर चर्चा केली.

लघु, मध्यम उद्योगांसाठी महाराष्ट्र - थायलंडने सहकार्य वाढवावे -  सुभाष देसाई
SHARES

भारत आणि थायलंड देशामध्ये अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध असून येत्या काळात लघु व मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि थायलंडने परस्पर सहकार्य वाढवावे, असं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं.


थायलंडमध्ये ट्रेड फेअर

थायलंड येथील जनरल कौन्सिल तसेच उद्योजकांचे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर असून शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे लघु व मध्यम उद्योगावर चर्चा केली. यावेळी कौन्सिल जनरल एकापोल पूलपिटा, डॉ. विमोनकोर्न कोसमस (डेप्युटी जनरल कौन्सिल), वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रमुख विजय कलंत्री आदी उपस्थित होते. यावेळी अन्न प्रक्रिया आणि पॅकेजिंग विषयावर थायलंडच्या शिष्टमंडळाने सादरीकरण केलं. महाराष्ट्रात उद्योग वाढीला मोठी संधी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. छोटे व मध्यम उद्योग वाढीमध्ये थायलंडचा मोलाचा वाटा आहे. भविष्यात या क्षेत्रात दोन्ही देशांनी काम करण्याची तयारी दर्शवली. या वर्षी थायलंडमध्ये होणाऱ्या ट्रेड फेअरसाठी महाराष्ट्राला आमंत्रित करण्यात आले.


लघु, मध्यम उद्योगावर भर 

लघु व मध्यम उद्योग हा उद्योग क्षेत्राचा कणा आहे. रोजगार निर्मितीमध्ये लघु व मध्यम उद्योगाचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासन या क्षेत्राला चालना देत असून या क्षेत्रासाठी विशेष धोरण राबवले जात आहे. देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत पैकी ३० टक्के निर्यात ही राज्यातून होते. राज्यातील ५० टक्के रोजगार हा लघु व मध्यम उद्योगांमधून तयार होतो. यासाठीच राज्य लघु व मध्यम उद्योगावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यांच्यासाठी सरकार राखीव जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

 उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्रात देश-विदेशातील गुंतवणूक वाढत आहे. परकीय गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होते. उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. थायलंड येथे होणाऱ्या ट्रेड फेअरमध्ये महाराष्ट्राचा सहभाग असेल असे आश्वासन उद्योगमंत्री यांनी यावेळी दिले.हेही वाचा -

४ प्राॅपर्टी वेबसाइट्सला 'महारेरा'ची नोटीस

आरटीआयची माहिती आता महारेराच्या संकेतस्थळावर
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा