नोटबंदीवर आक्रोश

भायखळा - मोदींच्या 1000-500 नोटबंदीच्या निर्णयाला बरेच दिवस उलटून गेले. तरी देखील बँकाबाहेरची गर्दी कमी होताना दिसत नाहीय. त्यामुळे नागरिक बँकांबाहेर आपला राग व्यक्त करताना दिसायेत. भायखळा परिसरात तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाहेर संतप्त झालेल्या लोकांनी बँकेत घुसण्याचा जबरदस्त प्रयत्न केला. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे भायखळ्यात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी मोदीसरकार विरोधात घोषणाबाजी करत काँग्रेसनं नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध केला.

Loading Comments