आयआरबी इनविट फंडला सुरूवात

  Mumbai
  आयआरबी इनविट फंडला सुरूवात
  मुंबई  -  

  आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या आयआरबी इनविट फंड, इन्व्हेस्टमेन्ट ट्रस्ट अखेर बाजारात दाखल झाली आहे. आयआरबीने मंगळवारी एका पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. या फंडचा लिलाव 3 मे पासून होणार असून 5 मे रोजी बंद होणार आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पातील आयआरबी इनविट फंड ही देशातील पहिली इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेन्ट ट्रस्ट असल्याची माहिती यावेळी आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विरेंद्र म्हैसकर यांनी दिली. या फंडचा प्राईस बॅण्ड 100 रुपये ते 102 रुपये प्रति युनिट असा असणार आहे. या फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना करसवलतीचा लाभ मिळणार असल्याचेही यावेळी आयआरबी इनविट फंडकडून सांगण्यात आले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.