माॅलच्या तुलनेत मुंबई विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानांची जास्त कमाई

शहरातील यशस्वी मॉल्सच्या तुलनेत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रिटेलर्स २.४ पट व्यवसाय करत असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक इंडिया ने दिली आहे.

माॅलच्या तुलनेत मुंबई विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानांची जास्त कमाई
SHARES

शहरातील यशस्वी मॉल्सच्या तुलनेत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रिटेलर्स २.४ पट व्यवसाय करत असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार नाइट फ्रँक इंडिया ने दिली आहे. नाइट फ्रँकने 'कॅच थेम मूव्हिंग' या ट्रान्झिट रिटेलवर आधारीत अहवालात ही माहिती दिली आहे.

या अहवालानुसार देशातील एकूण विमानतळांनी मिळवलेल्या महसूलात मुंबईचा महसुलीचा वाटा ५४% इतका होता. जो जागतिक सरासरीपेक्षा अधिक आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये मुंबई विमानतळाने प्रत्येक प्रवाशाच्या मागे ७ अमेरिकन डॉलर्स इतका किरकोळ महसूल मिळवला.

भारतातील सर्वात मोठं शुल्कमुक्त (ड्युटी-फ्री) क्षेत्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित (एमआयएएल) इथं कार्यरत आहे. भविष्यात १,१६० हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शुल्कमुक्त व्यवसायाची त्यात भर पडेल.

गुलाम झिया, कार्यकारी संचालक - मूल्यमापन व सल्लागार रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी, नाइट फ्रँक इंडिया म्हणाले, “आर्थिक राजधानी असल्याने मुंबई विमानतळ व्यस्त विमानतळांपैकी एक विमानतळ आहे. २०१९ च्या अखेरपर्यंत मुंबई विमानतळावरील शुल्कमुक्त वस्तूंच्या विक्रीतून ०.८४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका व्यवसाय झाला. पुढील दशकात यांत आणखी वाढ होईल, अशी आमची अपेक्षा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईच्या हवाई प्रवासी क्षमतेस दर वर्षी अतिरिक्त ६० दशलक्ष प्रवाशांची वाढ देईल. त्याबरोबर महसूलातही वाढ होईल.  

संबंधित विषय