लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अधिक कालावधी

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा) ने जीवन विमा पॉलिसी (लाइफ इन्शुरन्स पॉलिसी) धारकांना मोठा दिलासा दिला आहे.

लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अधिक कालावधी
SHARES

कोरोनामुळे देशभरात 21 दिवसांचा  लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांना होत असलेला त्रास पाहता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा) ने जीवन विमा पॉलिसी (लाइफ इन्शुरन्स पॉलिसी) धारकांना मोठा दिलासा दिला आहे. जीवन विमा पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी आणखी 30 दिवसांचा कालावधी दिला आहे.

आता ज्या विम्यांच्या नूतनीकरणाची तारीख मार्च आणि एप्रिलमध्ये येत आहे, त्यांना प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अधिक वेळ मिळेल. जीवन विमा कंपन्या आणि जीवन विमा परिषदेने इर्डाला प्रीमियम भरण्यासाठी अधिक कालावधी देण्याची मागणी केली होती.

यापूर्वी थर्ड पार्टी वाहन विम्याच्या आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.  ज्या विम्याचे प्रिमियम २५ मार्च ते १४ एप्रिल या काळात देय होते. त्यामध्ये २१ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामुळे जरी या काळात ग्राहकाने त्याच्या विम्याचे नुतनीकरण केले नाही तर तो विमा रद्द होणार नाही. २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीतील विमा नूतनीकरण देय असलेल्या सर्व विमाधारकांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. या संदर्भात सरकारने शासकीय आदेश जारी केले आहेत.


हेही वाचा -

आरोग्यंमत्र्यांनी दिली तबलिगी नेत्यांना समज, म्हणाले...

मरकजला गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क न केल्यास कठोर कारवाई, मुंबई महापालिकेचा इशारा
संबंधित विषय