Advertisement

आता बँकांमधून, एटीएममधून काढा कितीही पैसे!


आता बँकांमधून, एटीएममधून काढा कितीही पैसे!
SHARES

मुंबई - होळीच्या शुभमुहूर्तावर आता आरबीआयने खास गिफ्ट दिले आहे. 1000-500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर ओढवलेले चलन संकट अखेर आता चार महिन्यांनंतर संपुष्टात आले आहे. आजपासून अर्थात 13 मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा संपली आहे. बचत खात्यातून रोख रक्कम काढण्यावर टाकलेली 50 हजारांची मर्यादा संपणार असून, बँकेतून तुम्हाला कितीही पैसे काढता येणार आहेत. त्यामुळे बँकांतील सर्व व्यवहार आता पूर्ववत होणार आहेत. 

आरबीआयच्या या निर्णयामुळे होळीच्या सणाला सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे बचत खात्याबरोबरच एटीएममधूनही आता पूर्वीप्रमाणेच पैसे काढता येणार आहेत. यासाठी नोटबंदीपूर्वीचेच नियम आता लागू असतील. 13 मार्च म्हणजेच आजपासून बचत खात्यांमधून पैसे काढण्याची मर्यादा पूर्णपणे संपुष्टात आली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे व्यापारी वर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे. 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आरबीआयने बँकेतून आणि एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा घातली होती.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा