Advertisement

लॉकडाऊनमुळे जीएसटी संकलन घटून ९७ हजार कोटींवर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशभरात 21 दिवसांचा लाॅकडाऊन घोषीत केला आहे. लाॅकडाऊनमुळे कंपन्यांचे व्यवहारच ठप्प झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे जीएसटी संकलन घटून ९७ हजार कोटींवर
SHARES

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशभरात 21 दिवसांचा लाॅकडाऊन घोषीत केला आहे. लाॅकडाऊनमुळे कंपन्यांचे व्यवहारच ठप्प झाले आहेत. त्यामुळे मार्चमध्ये वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन मार्चपर्यंत 1 लाख कोटी रुपयांच्या खाली गेले आहे.

मागील चार महिने म्हणजेच फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबरमध्ये 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक जीएसटी वसूल झाला होता. मार्चमध्ये जीएसटीतून केवळ ९७,५९७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. हा मार्च २०१९ च्या १.०६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ८.४ टक्के कमी आहे. फेब्रुवारीमध्ये १.०५ लाख कोटी रुपये, जानेवारीमध्ये १.१० लाख कोटी रुपये, डिसेंबरमध्ये १.०३ लाख कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये १.०३ लाख कोटी रुपयांचा जीएसटी मिळाला होता. मार्चमध्ये ७६.५ लाख जीएसटी रिटर्न दाखल करण्यात आले. तर फेब्रुवारीमध्ये ८३ लाख रिटर्न दाखल झाले होते. लाॅकडाऊनमुळे जीएसटी रिटर्न कमी दाखल झाले आहेत.

अर्थ मंत्रालयाने सांगितलं की, मार्च २०२० मध्ये एकूण ९७५९७ कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटीचा हिस्सा १९१८३ कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे राज्य जीएसटी संकलन २५६०१ कोटी रुपये आहे. एकीकृत जीएसटी संकलन ४४५०८ कोटी रुपये राहिला. यामध्ये नियमित निपटाऱ्या अंतर्गत एकीकृत जीएसटी तून केंद्रीय जीएसटीला १९७१८ कोटी रुपये आणि राज्य जीएसटी अंतर्गत १४९१५ कोटी रुपये जारी केले आहेत. 



हेही वाचा -

धक्कादायक!.. आईसह ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण

पीएनबी बनली देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोेठी बँक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा