धक्कादायक!.. आईसह ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण

आईसह ३ दिवसांच्या चिमुरड्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

धक्कादायक!.. आईसह ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण
SHARES

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असतानाच मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईसह ३ दिवसांच्या चिमुरड्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी त्या महिलेच्या पतीनं आपल्या पत्नीसह बाळाला करोनाग्रस्तांसाठी नव्यानं रिकाम्या करण्यात आलेल्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्यानं त्यांना करोनाची लागण झाल्याचा आरोप केला आहे. सध्या या तिघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या रुग्णालयातील सदर नर्सिंग होममध्ये काम करणाऱ्या रिसेप्शनिस्टलादेखील करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता त्या महिलेची प्रसुती झाली. त्यानंतर महिलेला आणि तान्ह्या बाळाला दुपारी १२.३० च्या सुमारास एका वैयक्तीक खोलीत हलवण्यात आलं. परंतु, दुपारी २ च्या सुमारास एका नर्सनं त्यांना पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितलं. 

२४ तासांनंतर त्यांना डॉक्टरांचा फोन आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना 'ज्या खोलीत हलवण्यात आलं होती ती खोली करोनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे', असं सांगितलं. त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर तपासण्यासाठी येणार नाही असं त्यांनी सांगितलं. असा आरोपही महिलेच्या पतीनं केला आहे. 

'जर या गोष्टीची कल्पना असती तर आम्ही आमचे कपडे बदलले असते किंवा स्वत:ला सॅनिटाईझ केलं असतं. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आपल्या पत्नीमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती' असं त्यांच्या पतीनं स्पष्ट केलं आहे. 'ही वर्टिकल ट्रान्समिशनची केस आहे का याबद्दल आम्हाला कल्पना नाही. हे एक वैद्यकीय कायदेशीर प्रकरण आहे. बाळाला जन्मापासूनच व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असू शकते असल्याचं एका अन्य डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.हेही वाचा -

कोरोनामुळं पश्चिम रेल्वेला २०७ कोटींचा फटका

गरजूंसाठी सौरव गांगुलीनं दिले २ हजार किलो तांदूळसंबंधित विषय