Advertisement

विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट

लॉकडाऊन वाढणार नाही असं गृहीत धरून देशातील अनेक विमान कंपन्यांनी तिकीट बुकिंग सुरू ठेऊन प्रवाशांची लूट केल्याचं आता समोर आलं आहे.

विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट
SHARES

लॉकडाऊन वाढणार नाही असं गृहीत धरून देशातील अनेक विमान कंपन्यांनी तिकीट बुकिंग सुरू ठेऊन प्रवाशांची लूट केल्याचं आता समोर आलं आहे. मात्र, आता लाॅकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी तिकिटं रद्द करून पैसे परत मागितले आहेत. मात्र, आता विमाने उडणार नसतानाही विमान कंपन्या तिकिटाचे पैसे परत करण्यास तयार नाहीत. तसंच कंपन्यांनी ४ मे पासूनचे बुकिंगही सुरू ठेवलं आहे. 

लॉकडाऊनचा १४ एप्रिलला संपणार होते. त्यानंतर १५ एप्रिलपासून विमान सेवा नियमित सुरू होतील, असं भासवून विमान कंपन्यांनी पुढील तिकीट बुकिंगदेखील सुरूच ठेवले आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनीही १५ एप्रिलपासूनचे तिकीट ऑनलाइन काढले होते. पण लाॅकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढला आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा विमानप्रवास रद्द होणार आहे. मात्र, विमान कंपन्या प्रवाशांना परतावा देण्यास तयार नाहीत. त्याऐवजी अन्य दिवशीचे तिकीट कुठल्याही अतिरिक्त शुल्काविना काढा, असें कंपन्या सांगत आहेत. परंतु ज्यांना नंतर प्रवास करायचा नाही, त्यांना नाहक भुर्दंड बसणार आहे.

याबाबत मुंबई ग्राहक पंचायतने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. प्रवाशांनी वैयक्तिक कारणास्तव तिकिटे रद्द केलेली नाहीत. सरकारच्या निर्णयामुळे त्यांचा प्रवास रद्द होत आहे. त्यामुळे त्यांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळायलाच हवेत. तिकीट रद्द होताना विमानसेवा कंपन्या व ऑनलाइन पोर्टल्स अत्यल्प पैसे परत करीत आहेत. ही समस्या दूर होऊन ग्राहकांना पूर्ण पैसे परत मिळण्याबाबत केंद्र सरकारने विशेष मार्गदर्शक तत्त्वे तयार करायला हवीत, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

दादरमध्ये आणखी २ जण कोरोनाग्रस्त

कोरोनाचे धारावीत ५ नवे रुग्ण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा