Advertisement

गॅस सिलिंडरच्या किमतीत एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ

मागील तीन महिन्यांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली आहे. १ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडरचा भाव ५९४ रुपयांवरुन ६४४ रुपये झाला.

गॅस सिलिंडरच्या किमतीत एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ
SHARES

मागील काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल आता शंभरच्या आसपास पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्य हैरान झाला आहे. त्यातच आता पुन्हा सिलिंडरच्या दरांतही वाढ झाली आहे.  सरकारी तेल विपणन कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर २५ रुपयांची वाढ केली आहे. नवीन किंमती २५ फेब्रुवारीपासून लागू झाल्या आहेत. 

मुंबईत आता विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ७९४ रुपये झाली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. यापूर्वी सिलिंडरच्या किमतीत ४ फेब्रुवारीला २५ रुपयांची तर १४ फेब्रुवारीला ५० रुपयांची वाढ झाली होती. तर आता २५ फेब्रुवारीला  २५ रुपयांची वाढ झाली. म्हणजेच या महिन्यात एलपीजीच्या किमतीत १०० रुपयांची वाढ झाली आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असली तरी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती मात्र घटल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत पाच रुपयांनी कमी झाली आहे. हा सिलिंडर आता मुंबईत १४६८ रुपयांना मिळत आहे. 

मागील तीन महिन्यांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली आहे. १ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडरचा भाव ५९४ रुपयांवरुन ६४४ रुपये झाला. १ जानेवारी रोजी पुन्हा ५० रुपयांची वाढ झाली. यामुळे ६४४ रुपयांवरुन सिलिंडरचा दर ६९४ रुपये इतका झाला. ४ फेब्रुवारी रोजी पुन्हा वाढ झाल्याने हा भाव ७१९ रुपये इतका झाला. १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा दरवाढ होऊन ७१९ रुपयांवरुन ७६९ रुपये इतका झाला. त्यानंतर आता पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा