Advertisement

आता आधारलाही लावा मास्क, 'हा' होईल फायदा

UIDAI च्या वेबसाईटवरुन Masked e-Aadhaar कार्ड सहजपणे डाउनलोड करता येऊ शकतं.

आता आधारलाही लावा मास्क, 'हा' होईल फायदा
SHARES

आधार कार्डसाठी UIDAI कडून नवं फीचर जारी करण्यात आलं आहे. या नव्या फीचरमुळे १२ अंकी आधार नंबर कव्हर केला जाऊ शकतो, जेणेकरुन तो अधिक सुरक्षित केला जाऊ शकेल. याला आधार मास्क (Aadhaar Masked) करणं असं म्हटलं आहे.

ज्यावेळी तुमचा आधार नंबर इतर कोणाशी शेअर करायचा नसेल, त्यावेळी आधार मास्क करण्याची सुविधा वापरता येऊ शकते. UIDAI च्या वेबसाईटवरुन Masked e-Aadhaar कार्ड सहजपणे डाउनलोड करता येऊ शकतं.

आधार कार्ड Masked केल्यानंतर Aadhaar नंबरमधील पहिले ८ अंक लपवले जातात. लपवलेल्या ८ अंकाच्या जागी ती संख्या XXXX-XXXX अशी दिसेल. या Masked Aadhaar मध्ये शेवटचे केवळ चार अंकच दिसतील. अशाप्रकारे UIDAI द्वारे जारी करण्यात आलेली ही Masked Aadhaar ची सुविधा जवळपास सर्व ठिकाणी वैध मानली जाणार आहे.

जिथे महत्त्वाचं कागदपत्र म्हणून आयडेंटिटी प्रुफ Aadhaar Card दाखवण्याची गरज असते, त्या सर्व ठिकाणी हे Masked Aadhaar Card वैध मानलं जाणार आहे. उज्ज्वला योजना, LPG सबसिडी या सरकारी योजनांसाठी हे Masked Aadhaar वापरता येणार नाही.

कसं डाउनलोड कराल Masked Aadhaar?

  • सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर https://uidai.gov.in/ वर जावं लागेल.
  • त्यानंतर My Aadhaar पर्यायावर क्लिक करावं लागेल.
  • इथं Download Aadhaar सिलेक्ट करावं लागेल.
  • e-Aadhaar डाउनलोड करण्यासाठी Aadhaar Number, Enrolment ID आणि Virtual ID असे तीन पर्याय दिसतील.
  • इथं I Want a Masked Aadhaar असा पर्याय दिसेल, त्या चेक बॉक्सवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा. रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर Masked Aadhaar अॅक्सेस करता येईल.



हेही वाचा

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ, 'ही' आहे शेवटची तारीख

एलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा