Advertisement

येस बँकेने २,५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले


येस बँकेने २,५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले
SHARES

खासगी क्षेत्रातील नामांकीत बँक ‘एचडीएफसी’पाठोपाठ आता ‘येस बँके’नेही अंदाजे २,५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. खराब प्रदर्शन, अतिरिक्त कर्मचारी संख्या आणि डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने ही कर्मचारी कपात केल्याचे म्हटले जात आहे. नोकरीवरून काढून टाकलेल्या या कर्मचाऱ्यांचे प्रमाण बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के आहे.

येस बँकेने नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांचा अधिकृत आकडा दिलेला नसला, तरी डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी ही नोकर कपात केल्याचे बँकेने सांगितले आहे. बँकेने सध्या आॅटोमेशन आणि डिजिटायझेशन वाढवण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. उत्पादकता वाढवणे आणि गुंतवणूक खर्च कमी करणे हा बँकेचा यामागचा मुख्य उद्देश आहे.



यासंदर्भात येस बँकेच्या अधिकृत प्रवक्त्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलीही स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. बँकेचे दुसऱ्या तिमाहीतील प्रदर्शन समोर आल्यानंतर नेमक्या किती कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले, याची आकडेवारी देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. जून २०१७ मध्ये येस बँकेतील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २०, ८५१ एवढी होती.

यापूर्वी 'एचडीएफसी' बँकेने मार्च २०१७ पर्यंत ११ हजार कर्मचारी नोकरीवरून कमी केले होते. बँकिंग क्षेत्रात सध्या अत्यंत कमी नोकऱ्यांची संधी उपलब्ध असून देशातील सर्वात मोठी बँक 'स्टेट बँक आफ इंडिया'नेही खूप कमी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

बँकांनी डिजिटायझेनला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सर्वच बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात येत आहे. यांत मुख्यत्वेकरून कंत्राटी स्वरूपाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कंत्राटाचा कालावधी संपल्यानंतर त्यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही, असेही आपण म्हणू शकतो. येस बँकेअगोदरही अनेक बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी काढून टाकले आहेत.
- विश्वास उटगी, उपाध्यक्ष, ऑल इंडिया बँक इम्प्लॉई असोसिएशन




हेही वाचा -

आलं, गुगलचं 'मोबाईल वाॅलेट' अॅप

पेटीएमची पेमेंट बँक सुरु, 4 टक्के मिळणार व्याज



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा