Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

मुंबई सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत १२व्या स्थानी!

नुकत्याच झालेल्या एका अहवालानुसार मुंबईतली देशातली ७३टक्के संपत्ती ही देशातल्या १ टक्के लोकांकडे केंद्रीत झाल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची हक्काची राजधानी मुंबई देशातल्या सर्वाधित श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये १२व्या स्थानावर असल्याचं समोर आलं आहे. 'न्यू वर्ल्ड हेल्थ'ने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट होत आहे.

मुंबई सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत १२व्या स्थानी!
SHARES

बकाल वस्ती, झोपडपट्टी आणि प्रचंड मागसलेल्या भागांसोबतच मुंबईत टोलेजंग इमारती, त्याहून उंच आकाशाला भिडलेले जागांचे भाव आणि त्याहूनही उंच स्वप्न बघणारे गलेलठ्ठ पगारदार अशी दोन टोकं मुंबईत सहज दिसतील. पण यातलं एक टोक जरा जास्तच टोकदार आहे. एकीकडे प्रचंड गरीबी पोटात सामावलेली ही मुंबापुरी जगभरातल्या सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये १२व्या स्थानावर आहे.


न्यू वर्ल्ड हेल्थचा अहवाल

नुकत्याच झालेल्या एका अहवालानुसार मुंबईतली देशातली ७३टक्के संपत्ती ही देशातल्या १ टक्के लोकांकडे केंद्रीत झाल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची हक्काची राजधानी मुंबई देशातल्या सर्वाधित श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये १२व्या स्थानावर असल्याचं समोर आलं आहे. 'न्यू वर्ल्ड हेल्थ'ने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट होत आहे.


जगभरातल्या १५ शहरांची यादी

या आकडेवारीनुसार मुंबईची एकूण संपत्ती ही ९५० अरब डॉलर म्हणजेच ६१ लाख कोटींच्या घरात आहे. 'न्यू वर्ल्ड हेल्थ'ने जगभरातल्या एकूण १५ शहरांची यादी जाहीर केली असून मुंबईला १२वं स्थान दिलं आहे. या यादीमध्ये ३ ट्रिलियन डॉलरसह(१९३ लाख कोटी) अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर पहिल्या स्थानावर आहे.


जगातली सर्वाधिक श्रीमंत शहरं!


क्रमांक
शहर
संपत्ती (लाख करोड)
पहिला
न्यूयॉर्क
१९३
दुसरा
लंडन
१७३
तिसरा
टोकियो
१६१
चौथा
सॅन फ्रान्सिस्को
१४७
पाचवा
बीजिंग
१४१
सहावा
शांघाय
१२८
सातवा
लॉस एंजेलिस
९०
आठवा
हाँगकाँग
८३
नववा
सिडनी
६४
दहावा
सिंगापूर
६४
अकरावा
शिकागो
६३
बारावा
मुंबई
६१
तेरावा
टोरंटो
६०
चौदावा
फ्रँकफर्ट
५८
पंधरावा
पॅरिस
५५यात फक्त नागरिकांची खाजगी संपत्ती!

विशेष बाब म्हणजे या यादीमधल्या प्रत्येक शहराची संपत्ती ही फक्त तिथे राहाणाऱ्या नागरिकांच्या संपत्तीवरून काढण्यात आली आहे. यामध्ये तिथलं स्थानिक प्रशासन किंवा राज्य वा केंद्र सरकारच्या कोणत्याही संपत्तीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबईचाच विचार करायचा झाला, तर फक्त मुंबईकरांच्याच संपत्तीची बेरीज ६१ लाख कोटींच्या घरात आहे!


मुंबईत अरबपतीही जास्त!

याच अहवालानुसार अरबपती व्यक्तींच्या बाबतीचही मुंबईने इतर अनेक शहरांना मागे टाकले आहे. सर्वाधिक अरबपती असलेल्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश पहिल्या १० शहरांमध्ये आहे. मुंबईमध्ये तब्बल २८ अरबपती असल्याचा निर्वाळा या अहवालामध्ये देण्यात आला आहे. शिवाय, येत्या १० वर्षांत सर्वात वेगाने विकास करणारं शहर म्हणूनही मुंबईला मान मिळाला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा