Advertisement

वरळीतील 'या' बंगल्यासाठी सुरतच्या हिरे व्यापारानं मोजले १८५ कोटी

वरळीत प्रॉपर्टी खरेदीसाठी सूरतमधील सावजी ढोलकीया या हिरे व्यापाऱ्यानं १८५ कोटी मोजले आहेत.

वरळीतील 'या' बंगल्यासाठी सुरतच्या हिरे व्यापारानं मोजले १८५ कोटी
SHARES

वरळीत प्रॉपर्टी खरेदीसाठी सूरतमधील सावजी ढोलकीया या हिरे व्यापाऱ्यानं १८५ कोटी मोजले आहेत. एस्सार समूहाशी संबंधित ही प्रॉपर्टी आहे. २०१२ नंतर वरळीत झालेला हा दुसरा मोठा प्रॉपर्टी व्यवहार ठरला आहे.

30 जुलैला झालेल्या या व्यवहारामुळे वरळीतील प्रति चौरस फूट घराची किंमत ९३ हजार रुपयांवर पोहोचली आहे. निश्चितच ही किंमत सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरील आहे.

वरळी सीफेसला असलेल्या या बंगल्याचं नाव पन्हार बंगलो असं आहे. तळघर, तळमजला आणि सहा मजले अशी या बंगल्याची अंतर्गत रचना आहे.

पनहारचा २०००० चौरस फूट क्षेत्रफळ आहे. हा व्यवहार दोन करारानुसार करण्यात आला आहे. ज्यात एका करारात जमीन खरेदी करण्यात आली आहे. दुसऱ्या करारात इमारतीची खरेदी करण्यात आली आहे.जमिनीसाठी ४७ कोटी आणि इमारतीसाठी १३८ कोटींचा सौदा झाला आहे. याआधी २०१२ मध्ये वरळीत एका गेस्ट हाऊसची ४५२ कोटींना विक्री झाली होती.

याआधी ही मालमत्ता एस्सार समूहाच्या आर्पे होल्डिंग्ज लिमिटेड या कंपनीच्या नावे होती. याउलट बंगला खरेदी करणारी कंपनी सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी घनश्यामभाई धनजीभाई ढोलकिया यांच्या मालकीची आहे.

घनश्याम ढोलकिया हे सावजी ढोलकिया यांचे धाकटे बंधू आहेत. सावजी यांची ओळख देशातच नव्हे, तर जगात एक दानशूर मालक म्हणून आहे.

सावजी यांनीच २०१८ मध्ये त्यांच्या कंपनीतील तीन सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या कामगारांना मर्सिडीज कंपनीची आलिशान कार बक्षीस म्हणून दिली होती. त्याआधी २०१४ साली दिवाळी बोनस कंपनीतील तब्बल ५०० कामगारांना फ्लॅट्स आणि हिर्‍यांचे दागिने भेट दिले होते.

आर्पे होल्डिंग्ज कंपनीने याच बंगल्यावर इंडिया बुल्स हाऊसिंगकडून १४४ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामुळेच बंगल्याची रक्कम इंडिया बुल्सला दिल्याचं कागदपत्रांमध्ये नमूद केलेलं आहे. याआधीही या बंगल्याचे अनेक व्यवहार झाल्याचं मालमत्तेचे कागद पाहता लक्षात येते.

मुंबई महानगरपालिकेनं या बंगल्याखालील जमीन १३ ऑक्टोबर १९४१ रोजी पहिल्यांदा वार्षिक एक रुपया दरानं कुबालया राज यांना भाडेतत्त्वावर दिली होती. या बंगल्यामध्ये एकूण १५ अपार्टमेंट्स आहेत.

या बंगल्याचा वापर ढोलकिया कुटुंबासह कंपनीच्या काही खास कर्मचार्‍यांसाठी केला जाणार असल्याचं ढोलकिया कुटुंबानं सांगितलं. सुरतच्या या हिरे निर्यातदार आणि दागिने तयार करणार्‍या कंपनीची वर्षाची उलाढाल तब्बल ७ हजार कोटी रुपये इतकी आहे.


'या' वर्षातील महागडी खरेदी

राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा अनेक बड्या गुंतवणूकदारांनी लाभ घेतला.

  • पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईतील नेपियन सी रोडवर एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला. भोसले यांच्या 'एबी'ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीनं मुंबईत १०३ कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ३१ मार्च रोजी या व्यवहाराची नोंद झाली होती.
  • डी-मार्टचे राधाकृष्ण दमानिया यांनी मलबार हिलमध्ये १ हजार १ कोटी रुपयांना बंगला विकत घेतला होता. ५७५२ स्क्वेअर मीटरचा हा बंगला त्यांनी १.६ लाख रुपये प्रति स्क्वेअर फुटानं खरेदी केला. मलबार हीलमधील नारायण दाभोलकर मार्गावर असलेलया 'मधुकुंज' या नावाच्या प्रॉपर्टीची खरेदी केली. ३१ मार्च रोजी या व्यवहाराची नोंद झाली होती.
  • उद्योगपती अनुराग जैन यांनी ताडदेव इथं २ फ्लॅट १०० कोटींना खरेदी केले.
  • महानायक अमिताभ बच्चन यांनी ओशिवरा इथं ५७०० स्क्वेअर फुटांचे फ्लॅट ३१ कोटी रुपयांना विकत घेतले होते.



हेही वाचा

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये विविध पदांच्या १०४ जागांसाठी भरती

विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रात १५८ जागांसाठी भरती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा