रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानं मुस्लिम बांधव खूश

  मुंबई  -  

  कुर्ला - कुर्ला परिसरात राहणारे हे आहेत अन्सारी मोहम्मद मुर्तुजा. पेशानं रिक्षाचालक असलेल्या अन्सारी मोहम्मद मुर्तुजा यांची रोजची कमाई आहे 500 रुपये. एकूण आठ जणांचा त्यांचा परिवार. त्यात मुलाचं शिक्षण आणि मुलींच्या होऊ घातलेल्या लग्नाचाही खर्च. दरमहा जेमतेम 15 हजार कमावणाऱ्या अन्सारी मोहम्मद मुर्तुजा यांना काटकसर करावी लागतेय. घरखर्च, मुलांच शिक्षण यातून जेवढं उरत त्यातून थोडीफार बचत ते अभ्यूदय बँकेत करतात. मात्र जर रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारकडे मांडलेला प्रस्ताव अमलात आला तर त्याचा फायदा माझ्यासारख्या मोठं कुटुंब असलेल्या मुस्लिम समाजाला होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

  अन्सारी मोहम्मद मुर्तुजा यांच्या नंतर आमचा कॅमेरा वळला कुर्ल्यातच राहणाऱ्या हमिदा मोहम्मद सलिम खान यांच्या घरी. हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या हमिदा मोहम्मद सलिम खान या घरकाम करतात. सहा जणांचा परिवार असणाऱ्या हमिदा मोहम्मद सलिम खान यांनाही काटकसर करत घर सांभाळावे लागते. त्यातच दोन मुली लग्नाच्या. यामुळे त्यांच्यावर पैसे कुठून आणायचे हे धर्मसंकट. मात्र जर मुस्लिम समाजाला बिनव्याजी कर्ज देणारी बँक सुरू झाली तर त्याचा फायदा होईल अशी प्रतिक्रीया देत त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावाचं कौतूक केलं.
  एकूणच काय मुस्लिम समाजासाठी बिनव्याजी कर्ज देणारी बँक, आणि स्वतंत्र खिडकी योजना प्रस्तावित झाली तर मुस्लिम समाजाला त्याचा फायदा होईल. त्यासाठी मुस्लिम समाजानेही फतव्यांच्या जंजाळातून बाहेर पडत विकासाच्या वाटेवर चालायला हवं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.