Advertisement

१४ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांचं वेतन द्या, नॅशनल एव्हिएटर्स गिल्डची जेट एअरवेजला नोटीस

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जेट एअरवेजच्या समस्यांमध्ये आता आणखीच वाढ होताना दिसत आहे. कारण, जेट एअरवेजची पायलट्स असोसिएशन 'नॅशनल एविएटर्स गिल्ड'नं (एनएजी) मंगळवारी जेट एयरलाइन्सला नोटीस पाठवली आहे.

१४ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांचं वेतन द्या, नॅशनल एव्हिएटर्स गिल्डची जेट एअरवेजला नोटीस
SHARES

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जेट एअरवेजच्या समस्यांमध्ये आता आणखीच वाढ होताना दिसत आहे. कारण, जेट एअरवेजची पायलट्स असोसिएशन 'नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड'नं (एनएजी) मंगळवारी जेट एयरलाइन्सला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये जेट एयरवेजच्या पायलट्ससोबत इंजीनियर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागील ३ महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्यामुळं १४ एप्रिलपर्यंत पायलट्सचं वेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे.


वेतन देण्याची मागणी

नॅशनल एव्हिएटर्स गिल्डच्या नोटीसमध्ये कर्मचाऱ्यांनी १४ एप्रिलपर्यंत पायलट्सचं वेतन देण्याची मागणी केली आहे. तसंच, यापुढील वेतन महिन्याच्या १ तारखेला देण्याची मागणी करण्यात आली आहे. वेतन न दिल्यास कायदेशीर मार्गाचा कर्मचारी अवलंब करतील, असा इशारा देण्यात आला आहे.


फक्त ३२ विमानांचं उड्डाण

जेट एअरवेजनं मंगळवारी मुंबईतून फक्त २२ विमानांचे परिचालन केलं आहे. तसंच, मंगळवारी येथून फक्त ३२ विमानांचं उड्डाण झालं आहेत. यामध्ये १६ आगमन आणि १६ प्रस्थान उड्डाणे होती. जेट एअरवेजच्या पायलट्ससह इंजीनिअर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागील ३ महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही.हेही वाचा -

'पीएम मोदी' सिनेमाला मिळालं U सर्टिफिकेट, प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

मुंबईच्या लोकसभेच्या ६ जागांसाठी १५६ उमेदवार रिंगणातRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा