Advertisement

31 मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक न करणं पडणार महागात

पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्यासाठी आयकर विभागाकडून नवीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

31 मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक न करणं पडणार महागात
SHARES

पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड  (Aadhaar Card) जोडण्यासाठी आयकर विभागाकडून नवीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही तर पॅन कार्ड संबंधित सर्व कामं थांबवण्यात येतील आणि पॅन कार्डदेखील रद्द करण्यात येईल, असा इशारा आयकर विभागाने दिला आहे. तुम्ही Biometric Aadhaar authentication च्या माध्यमातून किंवा NSDL आणि UTITSL च्या केंद्रांवर जाऊन पॅन-आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करू शकता, असं आयकर विभागाने म्हटलं आहे.

केंद्र सरकारने पॅन कार्ड (PAN Card) आधार (Aadhaar Card) बरोबर जोडणं अनिवार्य केलं आहे. 

याआधीही आधार-पॅन लिंक करण्याची तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता  शेवटची तारीख  31 मार्च आहे, ज्यानंतर तुमचं पॅन कार्ड अन-ऑपरेटिव्ह होईल. अनेकांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक न केल्यामुळे लिंकिंगची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली होती.  आतापर्यंत 8 वेळा आधार-पॅन लिंकिंगची मुदत वाढवली आहे. 1 एप्रिलपासून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे.

31 मार्चपर्यंत आधार-पॅन लिंक केलं नाही तर पॅन कार्ड रद्द होणार आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चनंतर सुद्धा तुमचं पॅन कार्ड आधारसोबत जोडता येईल, मात्र जोपर्यंत तुम्ही लिंकिगची प्रक्रिया पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुमचं पॅनकार्ड इन-ऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय राहील. 

असं करा लिंक

तुमचं पॅन कार्ड ( PAN card) आधारशी लिंक करण्यासाठी ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर मेसेज करा. त्यावर UIDPAN लिहून स्पेस द्या. नंतर तुमचा आधार नंबर टाकून स्पेस द्या आणि पॅन कार्ड नंबर टाकून वरील दोन्ही नंबर पैकी एका नंबरवर 'एसएमएस' करा. तसॆच प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊनही तुम्हाला आधार लिंक करता येईल. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा. डाव्या हाताला आधार लिंक असा एक पर्याय असेल. त्यावर क्लिक करा. समोर आलेली माहिती भरा. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधारशी आपोआप लिंक होईल.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा