Advertisement

मोदी सरकार घेऊन येतंय १ रुपयाची नवीन नोट

नोटेचा रंग, आकार, मानके, वजन, डिझाईन याची सविस्तर माहिती मोदी सरकारनं प्रसिद्ध केली गेली आहे.

मोदी सरकार घेऊन येतंय १ रुपयाची नवीन नोट
SHARES

अर्थमंत्रालयानं १ रुपयाच्या नव्या नोटेच्या छपाईची अधिसूचना जारी केली आहे. या नोटेचा रंग, आकार, मानके, वजन, डिझाईन याची सविस्तर माहिती देखील प्रसिद्ध केली गेली आहे.

'अशी' असेल नवी नोट

फायनान्शियल एक्सप्रेसच्या बातमीनुसार, या नोटेचा आकार ९.७ बाय ६.३ सेंटीमीटर असून त्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वर भारत सरकार असं लिहिलंय. अर्थसचिव अतनू चक्रवर्ती यांची या नोटेवर दोन भाषांत सही आहे. या नोटेवर अनेक प्रकारचे वॉटरमार्क देखील आहेत. त्यात अशोकस्तंभ आहे पण सत्यमेव जयते नाही.

मध्यात एक तर उजवीकडे व्हर्टिकल स्टाईल मध्ये भारत अशी अक्षरे लपलेली आहेत. तसंच १ रुपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृती आहे. अधिसूचनेनुसार, नोटांवरील सिरीयल नंबर उजव्या बाजूला तळाशी डावीकडून उजवीकडे काळ्या रंगात असतील. या सिरीयल नंबरमध्ये नंबर आणि इंग्लिश अक्षरांचा देखील समावेश आहे. नोटेचा रंग हिरवा गुलाबी आहे.


१ रुपयाची नोट कोण छापतं?

१ रुपयाची नोट हे भारतीय चलनातील सर्वात कमी मूल्याचं चलन आहे. १ रुपयाच्या नोटा रिझर्व बँकेकडून नाही तर भारत सरकार कडून जारी केल्या जातात. त्यामुळे त्याच्यावर अर्थ सचिवांची सही असते

१ रुपयाच्या नोटेचा इतिहास

१ रुपयाची पहिली नोट ३० नोव्हेंबर १९१७ ला छापली गेली होती. त्यावर किंग जॉर्ज पंचम यांचा फोटो होता. रिझर्व बँकेच्या वेबसाईटनुसार १९२६ साली या नोटेची छपाई बंद झाली. त्यानंतर १९४० मध्ये १ रुपयाच्या नोटा पुन्हा छापल्या गेल्या आणि १९९४ मध्ये या नोटा छपाई बंद झाली. २०१५ पासून १ रुपयाची नोट पुन्हा छापली जाऊ लागली आहे.



हेही वाचा

SBI चे ‘एफडी’वरील व्याजदर ६ वर्षांत ‘इतके’ घटले

विमा पॉलिसीवर खुश नसल्यास ती परत करू शकता, 'हा' आहे नियम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा