'अभ्यास न करता सरकारनं नोटबंदीचा निर्णय घेतला'

  Pali Hill
  'अभ्यास न करता सरकारनं नोटबंदीचा निर्णय घेतला'
  मुंबई  -  

  मुंबई - अभ्यास न करता सरकारनं नोटबंदीचा निर्णय घेतल्याचं आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटलंय. नोटबंदी निर्णयाच्या दिवशी आरबीआयकडे तब्बल 4.95 लाख कोटी रुपयांच्या 2 हजारच्या नोटा असल्याची माहिती आरबीआयनं माहितीच्या अधिकारात दिलीय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मिळवलीय. नोटबंदीच्या निर्णयामुळे तब्बल 86 टक्के चलन रद्द झाले होते आणि त्याच्या पूर्तीसाठी सरकारनं 24.11 टक्के 2000 च्या नोटा छापल्याची माहितीही अनिल गलगली यांनी दिली. नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेला सुद्धा 500 आणि 1000 रुपयांच्या 20,51,66.52 कोटी चलनावर पाणी सोडावं लागलं. भारतीय रिझर्व्ह बँकेनं त्यांच्याकडे असलेल्या स्टॉकच्या एक चतुर्थांश चलनाची छपाई केली. रिझर्व्ह बँकेकडे 10,20,50,100,500 आणि 1000 रुपयांच्या एकूण चलनांची संख्या 12,42,300.1 कोटी होती तर त्याची एकूण किंमत 23,93,753.39 कोटी होती. यात 500 आणि 1000 च्या नोटांची संख्या 3,18,919.2 कोटी होती ज्याची एकूण किंमत 20,51,166.52 कोटी होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.