Advertisement

ब्लिंकिट (ग्रोफर्स)-Zomato कंपन्यांमध्ये विलीनीकरणाचा करार

ऑनलाईन किराणा घरपोच सेवा देणारी ब्लिंकिट (Blinkit) (पूर्वीची ग्रोफर्स) आणि Zomato या कंपन्यांनी विलीनीकरणाचा करार केला आहे.

ब्लिंकिट (ग्रोफर्स)-Zomato कंपन्यांमध्ये विलीनीकरणाचा करार
SHARES

ऑनलाईन किराणा घरपोच सेवा देणारी ब्लिंकिट (Blinkit) (पूर्वीची ग्रोफर्स) आणि Zomato या कंपन्यांनी विलीनीकरणाचा करार केला आहे. ब्लिंकिटनं नुकतीच झोमॅटोमधील विलीनीकरणाच्या करारावर (Merger Agreement Zomato Blinkit) स्वाक्षरी केली आहे.

हा करार सुमारे ७०० दशलक्ष डॉलर्सचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत झोमॅटोनं एक्सचेंजला (Stock Exchange updates) दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, ब्लिंकिटला त्याच्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झोमॅटो १५० दशलक्ष डॉलर्स कर्ज देईल.

ब्लिंकिटला आपल्या बिकट आर्थिक व्यवस्थेमुळे कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची वेळ आली होती. तसंच रोख भांडवलाची बचत करण्यासाठी कंपनीनं आपली गोदामं बंद करायला सुरुवात केली होती.

'झोमॅटोची ही गुंतवणूक या करारांतर्गत मान्य केलेल्या काही परंपरागत अटी आणि इतर अटींच्या पूर्ततेच्या अधीन आहे,' असंही झोमॅटोनं म्हटलं आहे.

दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या बातम्यांमुळे झोमॅटोच्या शेअरमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. Zomato ने एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की ते त्याच्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी ब्लिंकिटला $150 दशलक्ष कर्ज देणार आहे. हे कर्ज एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये दिले जाईल.

ब्लिंकिट ही कंपनी ताब्यात घेऊन झोमॅटोनं क्विक-कॉमर्स स्पेसमध्ये (Quick Commerce Space) आपलं स्थान मजबूत केलं आहे. गेल्या वर्षी ब्लिंकिटमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे हे स्पष्ट झालं होतं की, झोमॅटो २०२० मध्ये बंद करण्यात आलेला आपला किराणा माल सेवेचा व्यवसाय या प्लॅटफॉर्मवर आणेल.

तिसर्‍या तिमाहीच्या कमाईच्या अहवालात, झोमॅटोनं सांगितलं होतं की, क्विक-कॉमर्समध्ये झपाट्यानं पुढं जात असून, पुढील दोन वर्षांत या उद्योगात ४०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करेल.

ब्लिंकिट-झोमॅटो अधिग्रहण व्यवहार ६० दिवसांत पूर्ण होणं अपेक्षित आहे. ब्लिंकिटमध्ये ४० टक्के भागीदारी असलेल्या सॉफ्ट बँकला या व्यवहाराचा भाग म्हणून झोमॅटोमध्ये ४-५ टक्के भागभांडवल मिळेल तर टायगर ग्लोबल आणि सेक्वॉइया कॅपिटलला कंपनीमध्ये अतिरिक्त शेअर्स मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अधिक तपशील जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला.

याआधी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झोमॅटोनं (Zomato) ब्लिंकिटमध्ये सुमारे १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यावेळी, झोमॅटोनं सांगितलं होतं की, ब्लिंकिटमध्ये एकूण ४०० दशलक्ष डॉलर्स गुंतवण्याची त्यांची योजना आहे. यातील काही गुंतवणूक परिवर्तनीय म्हणून संरक्षित केली जाईल.

झोमॅटोनं त्या वेळी ब्लिंकिटचा ९.३ टक्के हिस्सा विकत घेतला होता, त्याचवेळी संभाव्य विलीनीकरणाचे संकेतही दिले होते.



हेही वाचा

पेट्रोलचे दर वाढवण्याची कंपन्यांची केंद्राकडे मागणी

खाद्यतेलांच्या दरांत २८ ते ३५ टक्के वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा